Nashik News: नाशिक जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांनी राजकीय समीकरणे बदलली आहेत. ११ नगर परिषदांसाठी २ आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान पार पडले होते. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला सर्वाधिक ५ जागा, तर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रत्येकी ३ ठिकाणी यश मिळाले. नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला असून शिवसेना शिंदे गट सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. .जिल्ह्यातील निकालात भगूरमध्ये शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) २५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) यश मिळवले. तर त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपला धक्का बसला..भगूर नगर परिषदेत शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडेयांच्यासमोर पराभूत झाल्या. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सरोजा हिरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती..येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भुजबळांनी येथे भाजपसमवेत युती करून गड कायम राखला. येथे राजेंद्र लोणारी हे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांचे पुतणे रुपेश दराडे यांचा त्यांनी पराभव केला..Local Body Result: बुलडाण्यात नगराध्यक्षपदांवर भाजप, काँग्रेसचे वर्चस्व.सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद गेले मात्र अटीतटीची निवडणूक होऊन त्यांचे खंदे समर्थक विठ्ठल उगले यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली. तर येथे भाजपचे हेमंत वाजे व शिवसेनेच्या शिंदे गटाचे नामदेव लोंढे यांचा पराभव झाला आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा प्रारंभ केला होता. मात्र इथेच भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. येथे शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार विजयी झाल्या. त्यांनी भाजपचे कैलास घुले यांचा पराभव केला..नांदगाव नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे सागर हिरे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे राजेश बनकर यांचा पराभव केला. मनमाड येथेही शिवसेनेचे योगेश पाटील हे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रवीण नाईक यांच्या पराभव केला. दोन्ही ठिकाणी आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळविला. पिंपळगाव बसवंतमध्ये भाजपचे डॉ. मनोज बर्डे विजयी झाल्याने आमदार दिलीप बनकर यांना स्वतःच्या गावातच पराभवाला सामोरे जावे लागले..Local Body Result: फुलंब्रीत भाजपला मोठा धक्का.सटाण्यात शिवसनेच्या (एकनाथ शिंदे गट) हर्षदा पाटील यांचा विजय झाला. येथे आमदार दिलीप बोरसे यांना धक्का बसला. चांदवड येथे भाजपचे वैभव बागुल विजयी झाले. त्यांनी अपक्ष राजाभाऊ अहिरे यांचा पराभव केला. .ओझर येथे भाजप जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांचा गड कायम राहिला असून अनिता घेगडमल यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जयश्री जाधव यांचा पराभव केला. इगतपुरी शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) शालिनी खताळे विजयी झाल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.