Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Kolhapur Voting : स्ट्राँगरूमला तिहेरी सुरक्षा व्यवस्था मतदान झाल्यानंतर सर्व इव्हीएम विधानसभा निहाय असलेल्या स्ट्राँगरूममध्ये जमा होतील.
Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituencyagrowon

Polling Lok Sabha Constituency : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ४७ कोल्हापूर व ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, (ता. ०७) मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल.

कोल्हापूर मतदारसंघात एकूण १९ लाख ३६ हजार ४०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी २ हजार १५६ मतदान केंद्र असणार आहेत. हातकणंगले मतदारसंघात एकूण १८ लाख १४ हजार २७७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी १ हजार ८३० मतदान केंद्र असणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्हयात एकुण १५ हजार ३ मतदान अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जात आहेत.

जिल्ह्यातील १ हजार ७५६ मतदान केंद्रावर वेब कास्टींगव्दारे निगरानी ठेवली जाणार आहे. सर्व मतदार केंद्रावर सावली मंडप, प्रतिक्षा कक्ष, एनएसएस/एनसीसी स्वयंसेवकांची मदत, मतदार मदत कक्ष, पिण्याचे पाणी, मेडीकल किटसह वैद्यकीय पथक आदी सुविधा मतदारांना पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हिल चेअरसह इतर आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

Lok Sabha Constituency
Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणूक कामात व्यस्त

स्ट्राँगरूमला तिहेरी सुरक्षा व्यवस्था मतदान झाल्यानंतर सर्व इव्हीएम विधानसभा निहाय असलेल्या स्ट्राँगरूममध्ये जमा होतील. त्यानंतर ते रात्री रमणमळा येथील स्ट्रॉगरूमध्ये कोल्हापूर मतदारसंघातील तर राजाराम तलाव येथील स्ट्रॉगरूमध्ये हातकणंगले मतदारसंघातील इव्हीएम आणण्यात येणार आहेत. इव्हीएम आणण्यात - येणाऱ्या सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा - बसविण्यात आली आहे. या स्ट्राँगरूमला पोलीस, राज्य राखीव दल आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान अशी तिहेरी सुरक्षा व्यवस्था असणार आहे.

मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, नि:ष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com