Orange  Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Variety : नागपुरी संत्र्याचा दर्जा सुधारण्यासाठी ९ कोटी

Orange Research : चव आणि रंगसंगतीच्या बाबतीत वेगळेपण जपणाऱ्या नागपुरी संत्र्याचा दर्जा सुधारण्यासाठी पुढाकार घेत निवड पद्धतीने नव्या वाणावर संशोधन केले जात आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : चव आणि रंगसंगतीच्या बाबतीत वेगळेपण जपणाऱ्या नागपुरी संत्र्याचा दर्जा सुधारण्यासाठी पुढाकार घेत निवड पद्धतीने नव्या वाणावर संशोधन केले जात आहे. त्याअंतर्गत विदर्भाच्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या शिवारातून याकरिता संत्रा कलम आणत त्याची लागवड कृषी विद्यापीठ प्रक्षेत्रावर करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या ९ कोटी रुपयांतून या अभिनव प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे.

संत्र्यावरील संशोधनाला चालना मिळावी याकरिता तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था नागपुरात स्थापन करण्यात आली. परंतु त्यांना नागपुरी संत्र्याच्या तोडीचे एकही वाण देता आले नाही. संत्रा उत्पादकांची नव्या वाणाच्या मागणी लक्षात घेता कृषी विभागाने यावरील संशोधनकामी निधी देण्यासाठी पुढाकार घेतला.

तब्बल ९ कोटी रुपयांची तरतूद करीत कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून निवड पद्धतीने नव्या वाणाच्या संशोधनाला बळ देण्यात आले आहे. नागपुरी संत्र्याच्या जातीमध्ये सुधारणा घडवून आणणे याकरिता प्रकल्प राबविला जात आहे. नागपूर, अमरावती विभागांत शेतकऱ्यांच्या शेतावर वैशिष्ट्यपूर्ण आढळलेल्या झाडांपासून कलम तयार करीत त्याची लागवड विद्यापीठ प्रक्षेत्रावर अकोला, काटोल आणि नागपूर या ठिकाणी करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता दोन वर्षे झाली असून, निवड पद्धतीच्या कलमांची लागवड दीड वर्षापूर्वी करण्यात आली आहे. येत्या काही वर्षांत या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम समोर येत नव्या संत्रा वाणाचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

डॉ. शशांक भराड, डॉ. विनोद राऊत यांच्या संनियंत्रणात हा प्रकल्प प्रभावीपणे पुढे सरकत आहे. विदर्भातील शिवारातून ७५० वैशिष्ट्यपूर्ण झाडांपासून रोपे आणत त्यातील टॉप टेन अशा रोपांची लागवड केली गेली. या प्रकल्पातून नव्या दर्जेदार वाणाची उपलब्धता करणे शक्‍य होणार आहे. संकरित वाणासोबतच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या माध्यमातून गॅमा रेडीएशनचा वापरही या संशोधनात होत आहे.
- कैलास मोते,संचालक, फलोत्पादन, कृषी आयुक्‍तालय, पुणे
संत्रा फळपिकात संकरित वाण देणे आव्हानात्मक आहे. त्यादृष्टीने प्राथमिकस्तरावर काम सुरू आहे. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या माध्यमातून कलमांवर गॅमा रेडीऐशन करून त्यापासून देखील नवे वाण विकसित करण्यावर भर दिला गेला आहे.
- डॉ. विनोद राऊत, प्रमुख, सेंटर फॉर एक्‍सलन्स, कृषी महाविद्यालय, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT