Orange Cultivation : बेडवरील संत्रा लागवडीतून‘ फायटोप्थोरा’चे नियंत्रण

Orange Farming : संत्र्यांची उत्पादकता, गुणवत्ता वाढ त्यासह ‘फायटोप्थोरा’ नियंत्रणात महत्त्वाकांक्षी ठरलेल्या इंडो-इस्राईल तंत्रज्ञान आधारित लागवडीला शेतकऱ्यांचाही प्रतिसाद मिळत आहे.
Orange Farming
Orange FarmingAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : संत्र्यांची उत्पादकता, गुणवत्ता वाढ त्यासह ‘फायटोप्थोरा’ नियंत्रणात महत्त्वाकांक्षी ठरलेल्या इंडो-इस्राईल तंत्रज्ञान आधारित लागवडीला शेतकऱ्यांचाही प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, बेडवरील लागवड क्षेत्र सुमारे तीन हजार हेक्‍टरवर पोहोचले आहे.
नागपुरी संत्रा चव आणि रंगसंगतीच्या बाबतीत जागतिकस्तरावर वेगळेपण जपणारा आहे.

परंतु जगातील इतर संत्रा वाणांच्या तुलनेत याची उत्पादकता अत्यल्प आहे. इतकेच काय तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये याच संत्रा वाणाची अधिक उत्पादकता शेतकरी घेतात. ही बाब लक्षात घेता उत्पादकता वाढ व गुणवत्ता सुधार यासाठी कृषी विभागाने ‘मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर’अंतर्गत २०१० मध्ये चार कोटी रुपयांची तरतूद केली.

Orange Farming
Orange Cultivation : संत्रा लागवडीत सेंद्रिय खत वापरावर भर

त्या अंतर्गत नागपूर येथे ‘सेंटर फॉर एक्‍सलंस’द्वारे इंडो-इस्राईल तंत्रज्ञानावर आधारित बेडवर संत्रा लागवड करण्यात आली. बेडवर लागवड असल्याने पाण्याचा झाडाशी संपर्क कमी होतो. परिणामी ‘फायटोप्थोरा’ नियंत्रणात राहतो, असे निरीक्षण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी अभ्यासाअंती नोंदविले आहे.

या पथदर्शी प्रकल्पाचे आणखी एक यश म्हणजे देशातील इतर संत्रा उत्पादक राज्यात असा प्रकल्प राबविण्याला केंद्राकडून मान्यता देण्यात आली. आता देशातील इतर प्रकल्पाचे अधिकारी नागपुरातील सेंटर फॉर एक्‍सलंसला पुढील महिन्यात २७ जूनला भेट देणार आहेत. इस्रायली तज्ज्ञांची देखील या वेळी उपस्थिती राहील.

Orange Farming
Orange Crop Damage : गारपीट, पूर्वमोसमी पावसामुळे संत्र्याला १३७ कोटींचा फटका

पारंपरिक लागवड पद्धतीत ६ बाय ६ मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्‍टरी २७७ झाडे बसत होती. इंडो-इस्राईल पद्धतीच्या आधारे ६ बाय ३ आणि ६ बाय ४ मीटर अशा दोन अंतराची शिफारस आहे. त्यामुळे झाडांची संख्या दुपटीने वाढत हेक्‍टरी ५५५ होते. त्यातूनच उत्पादकता वाढीचा उद्देशही साधता आला आहे.

संत्र्यामध्ये गुणवत्ता सुधार या संकल्पनेवर सेंटर फॉर एक्‍सलेंसकडून काम करण्यात आले. त्याचे दृश्‍य परिणाम शेतकऱ्यांकडून या तंत्रज्ञानाच्या अवलंबितेद्वारे समोर येत आहेत. अडीच ते तीन हजार हेक्‍टरवर बेडवर लागवड पोहोचली आहे. यातून ‘फायटोप्थोरा’वर नियंत्रण, त्यासह उत्पादकता वाढ असे उद्देश साधण्यात यश आले. अकोला कृषी विद्यापीठाकडून हा प्रकल्प प्रभावीपणे राबविला गेला आहे. कृषी विभागाने यासाठी निधीची तरतूद केली.
कैलास मोते, संचालक, फलोत्पादन, कृषी आयुक्‍तालय, पुणे
संत्रा झाडांची छाटणी शेतकरी करीत नव्हते. सेंटर फॉर एक्‍सलंसद्वारे बेडवरील लागवडीतून ‘फायटोप्थोरा’ नियंत्रण तसेच छाटणी अशा दोन शिफारशी केल्या आहेत. आता शेतकरी दोन्हींसाठी पुढे येत आहेत. ही निश्‍चितच बदलाची नांदी आहे. ठिबक, फर्टिगेशन, मल्चिंग या बाबींचा देखील यात समावेश आहे.
विनोद राऊत, प्रमुख, सेंटर फॉर एक्‍सलंस, कृषी महाविद्यालय, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com