Rabi Crops MSP agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Loan : सांगलीत रब्बीसाठी ८४ कोटींचे कर्जवाटप

Rabi Season : सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपास गती नाही. ऑक्टोबरअखेर ६ हजार ९६४ शेतकऱ्यांना ८४ कोटी ८४ लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपास गती नाही. ऑक्टोबरअखेर ६ हजार ९६४ शेतकऱ्यांना ८४ कोटी ८४ लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची टक्केवारी ६.६२ असून कर्ज वाटपाचे प्रमाण कमीच असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात १ लाख २० हजार ३५५ शेतकऱ्यांना १२८१ कोटी ३७ लाखांचे कर्ज वाटपाचे लक्ष्यांश आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीककर्ज उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने लवकरत लवकर कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

जिल्हा बॅंकेतून ६२ हजार २१९ शेतकऱ्यांना ६९२ कोटी ३७ लाख, राष्ट्रीय, व्यापारी बॅंकांकडून ३६ हजार २१७ शेतकऱ्यांना ३५६ कोटी २१ लाख तर, खासगी आणि ग्रामीण बॅंकांना २१ हजार ९१९ शेतकऱ्यांना २२९ कोटी ७९ लाख रुपये असे उद्दिष्ट दिले आहे.

जिल्ह्यात परतीचा पाऊस नसल्याने रब्बी हंगामला उशिरा प्रारंभ झाला. त्यामुळे या हंगामातील कर्ज घेण्यासाठी शेतकरी पुढे आले नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, ज्या भागात पाण्याची उपलब्धता आहे, या ठिकाणी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचे कर्ज घेतले आहे.

रब्बी हंगाम मध्यावर आला आहे. तरीही कर्जवाटपाचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील बॅंकांनी ऑक्टोबरअखेर ६ हजार ९५४ शेतकऱ्यांना ८४ कोटी ८४ लाखांच्या कर्जाचे वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेने ४ हजार २६६ शेतकऱ्यांना ३५ कोटी ३८ लाख, राष्ट्रीय बॅंकेने २ हजार ४१४ शेतकऱ्यांना ४२ कोटी ४७ लाख तर खासगी आणि ग्रामीण बॅंकांनी २७४ शेकऱ्यांना ६ कोटी ९९ लाखांचे कर्जाचे वितरण केले आहे. वास्तविक दरवर्षी रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटपात जिल्हा बॅंक आघाडीवर असते. जिल्हा बॅंकेने ऑक्टोबरअखेर ५ टक्के, तर सर्वाधिक कर्जवाटप राष्ट्रीय बॅंकेने ११.८२ टक्के केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy: शेतकरी अनुदानासाठीचे  ४८ लाख अर्ज पडून

Agriculture Department Scam: आवटे समितीच्या अहवालात दोन अधिकाऱ्यांवर ठपका

Jaggery Price: श्रावणामुळे गुजरातमध्ये गुळाच्या मागणीत वाढ

Maharashtra Heavy Rain: घाटमाथ्यावर पावसाचा जोर

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार सरी शक्य

SCROLL FOR NEXT