Rabi Crop Loan : मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत रब्बी कर्जपुरवठा सहा टक्क्यांवर

Rabi Season : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांत सहा नोव्हेंबरपर्यंत रब्बीसाठी उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ६.२८ टक्केच कर्जपुरवठा करण्यात आला आहे.
Rabi Crops MSP
Rabi Crops MSPagrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांत सहा नोव्हेंबरपर्यंत रब्बीसाठी उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ६.२८ टक्केच कर्जपुरवठा करण्यात आला आहे. मराठवाड्यातील ७६ पैकी १४ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

त्यामुळे यंदा अपेक्षित रब्बीची पेरणी होईल की नाही हा प्रश्‍न आहे. उपलब्ध पाणीसाठ्यांवर शेतकरी जमेल तशी रब्बीची पेरणी करत असताना खरीप हातचा गेलेल्या शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करण्यासाठी मोठी आर्थिक कसरत करावी लागत आहे.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांकरिता २ हजार ५४३ कोटी २७ लाख रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

या उद्दिष्टाच्या तुलनेत चारही जिल्ह्यांतील १४ हजार ९७४ शेतकऱ्यांना १५९ कोटी ६१ लाख ८ हजार रुपये कर्जपुरवठा करण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी तसेच व्यापारी व ग्रामीण बँक मिळून ६.२८ टक्केच उद्दिष्टाची पूर्ती केली आहे.

चारही जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ५८१ कोटी ९८ लाख रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी केवळ ५७ शेतकऱ्यांना २५ लाख ८ हजार रुपये कर्जपुरवठा करत बँकांनी ०.०४ टक्का उद्दिष्टपूर्ती केली. व्यापारी बँकांनी मिळालेल्या १ हजार ५५४ कोटी ८२ लाख रुपये कर्ज पुरवठ्याच्या उद्दिष्टापैकी १४६ कोटी ४३ लाख रुपये कर्जपुरवठा १३ हजार ६२५ शेतकऱ्यांना करून ९.४२ टक्के उद्दिष्टपूर्ती केली.

Rabi Crops MSP
Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीककर्ज वितरणाची तयारी सुरू

ग्रामीण बँकेने ४०६ कोटी ४७ लाख रुपये मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत १ हजार २९२ शेतकऱ्यांना १२ कोटी ९३ लाख रुपये कर्ज पुरवठा करून ३.१८ टक्केच उद्दिष्टपूर्ती केली आहे

Rabi Crops MSP
Rabi Crop Loan : रब्बी पीककर्ज प्रस्ताव वाढू लागले

जिल्हानिहाय कर्जवाटपाचे उद्दिष्ट व प्रत्यक्ष कर्जपुरवठा

जिल्हा छत्रपती संभाजीनगर

उद्दिष्ट ४११ कोटी ६१ लाख

प्रत्यक्ष कर्जपुरवठा २९ कोटी ४९ लाख

शेतकरी २ हजार ८२०

टक्केवारी ३.६४

जिल्हा जालना

उद्दिष्ट ४७७ कोटी

प्रत्यक्ष कर्जपुरवठा ५६ कोटी ९५ लाख

शेतकरी ५ हजार १८३

टक्केवारी ११.९४

जिल्हा परभणी

उद्दिष्ट ७४४ कोटी ८३ लाख

प्रत्यक्ष कर्जपुरवठा ६२ कोटी ७ लाख ६६ हजार

शेतकरी ५ हजार ९२९

टक्केवारी ८.३३

जिल्हा हिंगोली

उद्दिष्ट ५१० कोटी ३२ लाख

प्रत्यक्ष कर्जपुरवठा ११ कोटी ९ लाख ४२ हजार

शेतकरी १०४२

टक्केवारी २.१७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com