Pune News : गेल्या आठवड्यात पुणे विभागात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे रब्बी पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्यास पुन्हा पेरण्यांना वेग येण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
विभागात आत्तापर्यंत सरासरीच्या ११ लाख ४९ हजार २६६ हेक्टरपैकी सहा लाख ६२ हजार ९६० हेक्टर म्हणजेच ५८ टक्के पेरणी झाल्या आहेत. अद्यापही काही गहू, हरभरा या पिकांच्या पेरण्या बाकी आहेत. पावसामुळे थंडी कमी झाल्यामुळे पेरण्या करण्याचे शेतकऱ्यांनी थांबवले आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याने दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत असून पाण्याच्या कमतरतेमुळे तसेच जमिनीमध्ये ओलावा नसल्याने अपेक्षित वाढ झालेली नाही. तर, गव्हाच्या पेरण्या काही भागात अद्याप बाकी आहेत. तर पेरणी झालेल्या क्षेत्रातील गहू पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर, मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे.
हरभरा पिकाची काही भागातील पेरणी बाकी असून पेरणी झालेल्या क्षेत्रातील हरभरा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. करडई, सूर्यफूल व तीळ पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील तूर पीक फुलोरा अवस्थेत असून पावसाच्या खंडामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे तूर पिकाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
तर, नगर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. सद्यःस्थितीत गहू पीक रोप अवस्थेत आहे. हरभरा पीक काही ठिकाणी रोप अवस्थेत तर काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने काही तालुक्यात रब्बी पिकांचे व फळपिकांचे नुकसान झालेले आहे तसेच खरीप हंगामातील कांदा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्हानिहाय झालेली पेरणी, हेक्टरमध्ये :
सरासरी क्षेत्र -- पेरणी क्षेत्र -- टक्केवारी
नगर ४,५८, ६३६ --- २,५२,०७७ -- ५५
पुणे २,२९,७१२ --- १,०८,८०८ -- ४७
सोलापूर ४,६०,९१८ --- ३,०२,०७५ --- ६६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.