Grape Pruning Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Pruning : राज्यात ८० टक्के द्राक्षांची फळ छाटणी आटोपली

Grape Farming : राज्यात द्राक्षांची फळ छाटणीला गती आली असून, आजअखेर सुमारे ८० टक्के फळ छाटणी आटोपली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : राज्यात द्राक्षांची फळ छाटणीला गती आली असून, आजअखेर सुमारे ८० टक्के फळ छाटणी आटोपली आहे. येत्या पंधरवड्यात फळ छाटणी संपेल. सध्या द्राक्षाला पोषक वातावरण असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिसाला मिळाला आहे. मात्र गेल्या आठवड्यात वातावरणातील बदलाचा फटका बागेला बसल्याने काही अंशी डाऊनी, भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे.

द्राक्ष संघाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पन्नास टक्के फळ छाटणी झाली होती. मात्र या दरम्यान पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत बागा साधल्या आहेत. त्यानंतर फळ छाटणीला गती आली. गेल्या पंचवीस ते तीस दिवसांत ३० टक्के फळ छाटणी शेतकऱ्यांनी केली. आजमितीस सुमारे ८० टक्के फळ छाटणी उरकली आहे. येत्या पंधरवड्यात फळ छाटणी पूर्ण होईल.

गेल्या आठवड्यात धुके आणि बदलत्या वातावरणामुळे बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव वाढला. त्यातच भुरी आणि थ्रिप्सचाही शिरकाव झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. परंतु या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे रोग काही प्रमाणात आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना यश आले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून द्राक्ष बागेला पोषक वातावरण आहे. त्यामुळे उशिरा फळ छाटणी केलेल्या बागांवर फारसा रोगाचा प्रादुर्भाव नाही.

दरम्यान, अगोदर झालेल्या पावसामुळे गोळी घड जिरणे, घडांची अपेक्षित वाढ न होणे यासाऱ्याचा फटका ऑक्टोबरमध्ये फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागेला बसलाच आहे. सध्या बागेमध्ये वेलीला कमी अधिक घडांचे प्रमाण आहे. घड एकसारखेही नाहीत. त्यामुळे सरासरी उत्पादन कमी होईल, असा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे.

सध्या पोषक वातावरण असले तरी, द्राक्षाचा दर्जा आणि गुणवत्ता आताच सांगता येणे कठीण आहे. त्यासाठी अजून वीस ते पंचवीस दिवस लागती. त्यानंतर दर्जा आणि गुणवत्ता कशी आहे, हे स्पष्ट होईल. उशिरा फळ छाटणी केलेल्या बागा चांगल्या फुटल्या आहेत. तसेच पोषण वातावरण असल्याने सध्यातरी बागेवर नैसर्गिक टळले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

विभागनिहाय झालेली फळ छाटणी

विभाग टक्केवारी

सांगली ८०

नाशिक ९०

सोलापूर ४०

पुणे ७०

नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाला फटका बसला आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी बागा साधल्या असून, सध्या पोषक वातावरणामुळे बागा चांगल्या फुलल्या आहेत.
शिवाजी पवार, खजिनदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT