Grapes Production Sangli : सांगली जिल्ह्यात सततचा पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे द्राक्षबागांची फळ छाटणी लांबली आहे. फळ छाटणी हंगाम अंतिम टप्प्यात सुरू आहेत. केवळ १०-१५ टक्के क्षेत्राची छाटण्या शिल्लक राहिल्या आहेत. बागेत काम करण्यासाठी मजूर नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांकडे विनंती करून बोलवण्याची वेळ आली आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी शेतकऱ्यांना धुक्याशी सामना करावा लागतो आहे.
सांगली जिल्ह्यात आता रंगीत वाणाच्या लागवडीस प्राधान्य दिले जात आहे. तजम्बो, रेडग्लोब, एसएसएन, बुलेट. शरद, तास ए गणेश, थॉमसन सीडलेस, सोनाका, किंगबेरी, क्रिमसन आदी वाणांच्या द्राक्ष बागांची लागवड शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सांगली जिल्हा द्राक्षे निर्यात करण्यासाठी कायम अग्रेसर राहिल्याने निर्यातक्षम द्राक्षाची गेल्या महिन्यात नोंदणी झाली आहे. यंदा मात्र, हवामानातील बदल आणि सततच्या पावसामुळे निर्यातक्षम बागांची संख्या घटण्याची शक्यता असल्याचे मात द्राक्ष बागायतदार शेतकरी करत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ‘ग्लोबल वार्मिंग’मुळे द्राक्षशेती संकटग्रस्त झाली आहे. पाऊस, अतिवृष्टी, चक्रीवादळ व गारपीट, द्राक्षमण्यांमध्ये कॅकिंग समस्या निर्माण होत असल्याने द्राक्षशेती बेभरवाशाची झाली असल्याचे मत द्राक्ष बागायतदार शैलेश कोरे यांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने सप्टेंबर व ऑक्टोबर दोन टप्प्यांत द्राक्षबागांची फळ छाटणी केली जाते. मात्र यावर्षी बहुतेक द्राक्ष बागांची छाटणी ऑक्टोबर महिन्यात करावी लागली असल्याने फेब्रुवारी ते मार्चदरम्यान एकाच वेळी द्राक्षाचा काढणी हंगाम सुरू होणार होता. यंदा नोव्हेंबरमध्येही छाटण्या सुरू आहेत. बाजारभाव व बाजारपेठ ही समस्या निर्माण होण्याची शक्यता द्राक्ष उत्पादकांमधून व्यक्त होत आहे.
राज्यात ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान द्राक्ष बागांची छाटणी तीन टप्प्यांमध्ये फळ छाटण्या घेतल्या जातात. त्यामुळे बाजारपेठेचा प्रश्न निर्माण होत नाही. यावर्षी सांगली, नाशिक प्रमुख बेल्टमध्ये द्राक्ष छाटणीची कामे उशिरा झाली आहेत. द्राक्षबागांच्या बहुतेक छाटण्या सप्टेंबरअखेर ते ऑक्टोबरदरम्यान झाल्या. यामुळे राज्यातील द्राक्ष तोडणीचा हंगाम एकाच वेळेला सुरू होणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.