Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सोलापुर जिल्ह्यात अद्यापही ७८ कोटींची ‘एफआरपी’ थकित

Sugarcane FRP Update : खरीप हंगाम तोंडावर येऊनही जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांनी तब्बल तीन महिन्यांनंतरही उसाच्या ‘एफआरपी’चे ७८.४६ कोटी रुपये अद्यापही थकवले आहेत.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात यंदा पाऊस बऱ्यापैकी झाला आहे, अनेक भागांत पेरण्याही सुरू झाल्या आहेत. पण ऐन खरीप हंगाम तोंडावर येऊनही जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांनी तब्बल तीन महिन्यांनंतरही उसाच्या ‘एफआरपी’चे ७८.४६ कोटी रुपये अद्यापही थकवले आहेत.

जिल्ह्यात यंदा ३६ कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतला होता. साखर आयुक्तालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार त्यापैकी २७ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिल्याचे आकडेवारीवरून दिसते. हंगाम संपून साडेतीन ते चार महिने उलटले आहेत. कारखान्यात उसाचे गाळप झाल्यावर १५ दिवसांत एफआरपी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही ऊसबिले मिळत नसल्याने शेतकरी कारखान्यांवर खेटे मारून दमले आहेत.

एफआरपी दिल्याचे कागदोपत्री मृगजळ

कमीच्या साखर उताऱ्यामुळे अनेक कारखान्यांची अंतिम एफआरपी कमी निघाली. तथापि, बहुतांश कारखान्यांनी पहिला हप्ता अधिकचा दिल्याने हंगाम संपल्यावर एकुणात अशा कारखान्यांच्या थकित एफआरपीचा आकडा अहवालात कमी दिसत आहे. मात्र जाहीर केल्याप्रमाणे ऊसबिले देण्यासाठी पैशाची उपलब्धता कशी करायची, या प्रश्‍नाने कारखानदारांना ग्रासले असल्याचे दिसून येते.

१५ जूनअखेरची थकित एफआरपी(कोटींत)

कारखाना थकीत

सिद्धेश्‍वर १०.५६

संत कूर्मदास १.९९

सासवड माळी २.८६

विठ्ठल कार्पोरेशन ७.२०

मातोश्री १५.२३

जयहिंद ९.१९

विठ्ठल रिफाईंड १६.२१

विठ्ठल, पंढरपूर १४.५४

आदिनाथ ०.६८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT