Sugarcane FRP : सोलापुर जिल्ह्यात ऊसबिलाचे १९५ कोटी रुपये अद्यापही थकीतच

Sugar Factory : सोलापुर जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांनी हंगाम संपून तीन महिन्याचा कालावधी लोटला, तरी १५ मेअखेर अजूनही १९५.७५ कोटींचे उस बिलाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले नाहीत.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Malinagar News : सोलापुर जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांनी हंगाम संपून तीन महिन्याचा कालावधी लोटला, तरी १५ मेअखेर अजूनही १९५.७५ कोटींचे उस बिलाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले नाहीत. त्यामुळे आता शेतीची मशागत, चारा व पाणीटंचाईचा सामना, मुलांचे ऍडमिशन कसे करायचे, असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे.

उसाचे गाळप झाल्यापासून १४ दिवसात त्याचे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणे साखर कारखान्यांना कायद्याने बंधनकारक आहे.तथापि,बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून बराच कालावधी उलटून गेला आहे. कारखान्यांचे गाळप कधीच थांबले आहे. शेतकरी वर्षभर काबाडकष्ट करून ऊस पिकवतो.

Sugar Factory
Sugarcane FRP : सोलापुर जिल्ह्यात २५७ कोटींची ‘एफआरपी’ थकित

हा ऊस कारखान्याला पाठविल्यानंतर १५ दिवसात त्याचे पैसे हातात पडतील, हे गृहीत धरून शेतकरी वर्षभराच्या खर्चाचे नियोजन करतो, असे असले तरी जून महिना उंबरठ्यावर आला आहे. मात्र, अजूनही १८ कारखान्यांनी उस बिल थकवले आहे. काही कारखान्यांनी आगाऊ रक्कम दिली; पण पूर्ण रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही.

त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यात अवकाळी पावसाने काही भागात हजेरी लावली. यंदा मॉन्सून वेळेवर येणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतात पूर्वमशागत करावी लागणार आहे. पण उसबिल थकल्याने मशागतीसह इतर खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

Sugar Factory
Sugarcane Water Management : ऊस पिकातही वाचवता येते ६० टक्के पाणी

ऊसबिलांचे क्रॉस चेकिंग आवश्यक

साखर आयुक्तालयाकडून दर पंधरवड्याला कारखान्यांनी दिलेली व थकीत ऊसबिले याचा आढावा घेतला जातो. काही कारखाने थकीत ऊसबिलाचा आकडा फुगलेला दिसू नये व त्यामुळे होणारी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ‘मॅन्युपलेशन’ करून साखर आयुक्तालयात आकडेवारी सादर करत असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी कारखान्यांनी पंधरवड्यात दिलेल्या ऊसबिलाच्या बँकांनी प्रमाणित केलेल्या याद्या साखर आयुक्तालयाने ग्राह्य धरायला हव्यात. कारखान्यांची पंधरवड्याची आकडेवारी व बँकांनी प्रमाणित केलेल्या याद्यांचे क्रॉस चेकिंग करणे आवश्यक आहे. तरच शेतकऱ्यांना उसाचे बिल वेळेत मिळू शकणार आहे, असे सांगण्यात आले.

१५ मेअखेर कारखान्यांकडे थकीत एफआरपी (कोटीत)

कारखाना थकीत रक्कम

सिद्धेश्वर १९.१५

संत कुर्मदास ४.८५

लोकनेते १६.५०

सासवड माळी १०.९५

लोकमंगल, बिबीदारफल २.३६

लोकमंगल, भंडारकवठे ०.४१

विठ्ठल कार्पोरेशन ३१.४६

सिद्धनाथ ४.८६

भैरवनाथ, विहाळ ४.२७

भैरवनाथ, लवंगी ४.७०

मातोश्री २२.५६

जयहिंद १५.८८

विठ्ठल रिफाइंड १६.२१

भीमा ४.९४

सहकार शिरोमणी ३.१९

विठ्ठल, पंढरपूर २४.८१

आदिनाथ ०.६८

येडेश्वरी ७.९७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com