Sugarcane FRP : सोलापुर जिल्ह्यात ‘एफआरपी’चे १३८ कोटी रुपये थकितच

Sugarcane Season : सोलापुर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांकडे २०२३-२४ च्या गाळप हंगामातील उसाच्या ‘एफआरपी’चे मेअखेर अजूनही १३८ कोटी रुपये थकले आहेत.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापुर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांकडे २०२३-२४ च्या गाळप हंगामातील उसाच्या ‘एफआरपी’चे मेअखेर अजूनही १३८ कोटी रुपये थकले आहेत. दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या पावसाने आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना उर्वरित ऊसबिले तत्काळ मिळणे गरजेचे आहे.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : सोलापुर जिल्ह्यात २५७ कोटींची ‘एफआरपी’ थकित

जिल्ह्यात या वर्षी ३६ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. फेब्रुवारीअखेर जिल्ह्यातील कारखान्यांकडे एफआरपीचे ४१४ कोटी, मार्चअखेर ४५२ कोटी, तर एप्रिलअखेर २५७ कोटी रुपये थकले होते. १५ मेअखेर १८ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे उसाचे १९५ कोटी अडकले होते. त्यानंतरच्या पंधरवड्यात म्हणजे मेअखेर कारखान्यांनी त्यापैकी ५९ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : सोलापुर जिल्ह्यात ऊसबिलाचे १९५ कोटी रुपये अद्यापही थकीतच

काही कारखान्यांनी बेसिक रिकव्हरीनुसार निघणाऱ्या एफआरपीपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. शेतकऱ्यांना या वर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई, चाराटंचाईवर मोठा खर्च करावा लागला. आता पावसाचे संकेत मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मशागत, बियाणे, खते याचा खर्च त्यांना खुणावत आहे. अशातच जून महिना सुरू झाल्याने मुलामुलींच्या शैक्षणिक प्रवेशासाठी अतिरिक्त आर्थिक तरतूद शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

पाच कारखान्यांवर ‘आरआरसी’ कारवाई

यंदाच्या ऊस गाळप हंगामात जिल्ह्यातील पाच कारखान्यांवर साखर आयुक्तालयाकडून आरआरसी (महसूल वसुली प्रमाणपत्र) कारवाई झाली आहे. साखर कारखान्यांकडील साखर जप्त करण्याची तरतूद त्यामध्ये आहे. म्हैसगावच्या विठ्ठल कार्पोरेशनवर २ फेब्रुवारीला ५६.७४ कोटी व २६ मार्चला २९.३८ कोटी रुपयांची अशी दोनदा आरआरसी झाली. मातोश्री कारखान्यावर २२.५६ कोटी, विठ्ठल रिफाइंडवर १६.२१ कोटी, तर आदिनाथ कारखान्यावर ०.६८ कोटी रुपयांची ३१ मे रोजी आरआरसी कारवाई करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com