सांगलीत रब्बीचा 60 टक्के पेरा  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात रब्बीचा ६० टक्के पेरा

Rabi Season : सांगली जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगाम पावसाअभावी उशिरा पेरा सुरू झाला. आतापर्यंत १ लाख १५ हजार ५२४ हेक्टरवर पेरणी झाली असून, सर्वाधिक पेरा ज्वारीचा झाला आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगाम पावसाअभावी उशिरा पेरा सुरू झाला. आतापर्यंत १ लाख १५ हजार ५२४ हेक्टरवर पेरणी झाली असून, सर्वाधिक पेरा ज्वारीचा झाला आहे. जत तालुक्यात करडईची पेरणी होते, परंतु अपेक्षित दर मिळत नसल्याने करडईच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९० हजार ९६१ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ज्वारीचे १ लाख २६ हजार ६५ हेक्टर क्षेत्र आहे. वास्तविक पाहता, दुष्काळी पट्ट्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव या तालुक्यांत रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी सर्वाधिक होते. परंतु परतीचा पुरेसा पाऊस झाला नसल्याने ज्वारीच्या पेरणीला उशिरा सुरुवात झाली आहे. आजअखेर ज्वारीचा पेरा ९९ हजार ४०५ हेक्टर म्हणजे ७८ टक्के पेरणी झाली आहे. त्यापैकी सर्वांत जास्त जत तालुक्यात ज्वारीची पेरणी झाली आहे.

मका पिकाची पेरणी ६१ टक्के झाली असून, ज्वारी आणि मका पिकांची वाढ चांगली झाली असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.जत तालुक्यात करडईचे पीक घेतले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून करडईचा उत्पादन खर्च आणि मिळणारा दर यामुळे आर्थिक गणित कोलमडले असल्याने करडईच्या क्षेत्रात घट होत आहे. यंदाच्या हंगामात करडईचे ४ हेक्टरवर म्हणजे १ टक्का पेरा झाला आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज १५ हजार ८३७

जत ६२ हजार २६०

खानापूर ३ हजार २०१

वाळवा १ हजार ७०८

तासगाव ४ हजार ००५

शिराळा ८३५

आटपाडी ९ हजार ३०१

कवठेमहांकाळ १६ हजार ०६६

पलूस ५३१

कडेगाव १ हजार ७८०

एकूण १ लाख १५ हजार ५२५

पीक निहाय पेरा (क्षेत्र हेक्टरमध्ये)

ज्वारी ९९ हजार ४०५

मका ११ हजार ०९०

गहू १ हजार ६६०

हरभरा ३ हजार ३३७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT