Wheat Sowing : खानदेशात गहू पेरणी सुरू; क्षेत्र कमी राहण्याचा अंदाज

Rabi Seaosn : खानदेशात गव्हाची पेरणी सुरू झाली आहे. ज्या भागात मुबलक जलसाठे आहेत, त्याच भागात पेरणी केली जात आहे. यंदा पेरणी कमी होईल, असे संकेत आहेत.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात गव्हाची पेरणी सुरू झाली आहे. ज्या भागात मुबलक जलसाठे आहेत, त्याच भागात पेरणी केली जात आहे. यंदा पेरणी कमी होईल, असे संकेत आहेत. गहू पिकातून धान्य मिळते. कसदार चारा मिळत नाही. गव्हाच्या काडला किंवा चाऱ्यास हवा तसा दर नसतो. ही काड दूध उत्पादक, पशुधनपालक खरेदी करीत नसल्याने ती शेतातच जाळावी लागते किंवा काडचे अवशेष जमिनीत गाडले जातात.

याशिवाय गव्हाला पाच वेळेस काळ्या कसदार जमिनीत पाणी द्यावे लागते. बियाणे, खते यावरचा खर्चही आहे. कापणी, मळणीसाठीदेखील खर्च वाढला आहे. अधिक पाणी लागत असल्याने फक्त तापी, गिरणा, अनेर नदीकाठच्या भागात गव्हाची पेरणी होईल, असे चित्र आहे.

गव्हाची जळगाव जिल्ह्यात १७ ते १८ हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित असते. परंतु यंदा ही पेरणी १३ ते १४ हजार हेक्टरवरच होईल. तर खानदेशात मिळून २० ते २१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी होवू शकते, असाही अंदाज आहे.

Kharif Sowing
Wheat Sowing : गहू लागवडीकडे यंदा अधिक कल

हलक्या जमिनीच्या भागात गव्हाचे हवे तसे उत्पादन हाती येत नाही. तसेच अशा क्षेत्रात वारंवार सिंचन करावे लागते. गहू पिकासाठी ठिबकचा कार्यक्षम वापर करता येत नाही. त्यात ठिबकचे उंदीर अधिकचे नुकसान करतात. तसेच पिकाला हवे तेवढे पाणीही मिळत नाही. पाट पद्धतीनेच कमाल शेतकरी गव्हाचे सिंचन करतात. यामुळे हलक्या क्षेत्रात गव्हाची पेरणी शेतकरी टाळतील.

Kharif Sowing
Wheat sowing: गव्हाला रेकॉर्डब्रेक भाव मिळूनही यंदा पेरा का वाढला नाही?

खानदेशात सध्या तापी, गिरणा, अनेर नदीकाठी पेरणी काही शेतकरी करीत आहेत. दिवाळीच्या काळात वेळ पुरेसा राहणार नाही किंवा पेरणी होणार नाही. तसेच खानदेशात थंडीचे आगमन झाले आहे.

किमान तापमान १४, १२ व ११ अंश सेल्सिअसखाली राहत असल्याची नोंदही मागील काही दिवस झाली आहे. यामुळे शेतकरी गहू पेरणी करीत आहेत. रावेर, यावल, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा भागात काही शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे.

दरही कमी

गव्हाचे दरही हवे तसे नाहीत. मागील हंगामात शेतकऱ्यांना किमान २००० व कमाल २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर लोकवन गव्हाच्या विक्रीतून मिळाला. यंदाही दर असेच आहेत. गावोगावी शासनाकडून रास्तदरात धान्य दिले जात असल्याने त्यास ग्रामीण भागात गिऱ्हाइकी नाही. बाजार समितीत वाहतूक, हमाली, तोलाई व इतर खर्च लागतो. एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन मिळते. यामुळे गहू पीक परवडत नाही, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com