Rabi Sowing : रब्बीची पेरणी ३५ टक्केच; मोठे क्षेत्र नापेर राहणार

Sowing Update on Rabi Crop : खानदेशात एकूण पावणेचार लाख हेक्टरवर विविध रब्बी पिकांची पेरणी अपेक्षित आहे. खानदेशात आजघडीला फक्त ३५ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात नोव्हेंबरचा दुसरा पंधरवडा सुरू झाला आहे. परंतु रब्बी पिकांची पेरणी समाधानकारक स्थितीत नाही. यंदा पेरणी ९० टक्केच होईल, असे दिसत आहे. कमी पाऊसमान, अल्प जलसाठे यामुळे मका, कांदा, गहू लागवडीला फटका बसत आहे.

खानदेशात एकूण पावणेचार लाख हेक्टरवर विविध रब्बी पिकांची पेरणी अपेक्षित आहे. यात हरभऱ्याची पावणेदोन लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. खानदेशात आजघडीला फक्त ३५ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्यात हरभरा व दादर ज्वारी, संकरित ज्वारी पिकाचा समावेश आहे.

Rabi Sowing
Rabi sowing : रब्बी पेरणीला वेग , राज्यात सरासरी केवळ २७ टक्के पेरणी

मका, कांदा, गहू या पिकांना अधिकचे पाणी लागते. यामुळे या पिकांची पेरणी फारशी दिसत नसल्याचे चित्र आहे. उन्हाळ किंवा रब्बीमधील कांदा लागवड खानदेशात १२ते १३ हजार हेक्टरवर अपेक्षित होती. परंतु ही लागवड आठ ते नऊ हजार हेक्टरवर होईल. कारण रोपवाटिका खानदेशात १०० हेक्टरवरदेखील नाहीत. कांद्याचे दर सध्या चांगले आहेत.

परंतु मागील दोन हंगाम रब्बीमधील कांद्याला दर अल्प मिळाले. तसेच यंदा पाऊसमान कमी आहे. यामुळे धुळे जिल्ह्यातील लागवडीला मोठा फटका बसेल, अशी माहिती मिळाली. जळगाव जिल्ह्यात फक्त यावल, चोपडा, चाळीसगाव याच भागात लागवड बऱ्यापैकी होईल. धरणगाव, एरंडोल, जळगाव भागातील लागवड कमी होईल. धुळ्यातील साक्री, धुळे या भागात कांदा पीक अधिक असते. परंतु या भागात दुष्काळ आहे. विहिरींचे जलसाठे आटत आहेत.

Rabi Sowing
Rabi Sowing : परभणी जिल्ह्यात रब्बीची १२.६२ टक्के पेरणी

यासह मका, गहू पेरणीदेखील अल्पच आहे. मका व गव्हाची मिळून सुमारे एक लाख हेक्टरवर खानदेशात पेरणी अपेक्षित होती. परंतु एवढी पेरणी होणार नाही. कारण या पिकांना पाणी अधिक लागते. गव्हाऐवजी शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभऱ्याची पेरणी केली आहे. मक्याची लागवड रावेर, यावल व चोपडा या भागात सुरू आहे. गव्हाची पेरणी खानदेशात नंदुरबारमधील शहादा, तळोदा, जळगावमधील चोपडा, यावल व रावेर भागातच सुरू आहे. इतर भागात अपवादानेच पेरणी सुरू आहे.

पेरणी रखडतच

खानदेशात रब्बी पिकांची पेरणी सणासुदीमुळे रखडली होती. अद्यापही किंवा मागील दोन दिवसातही पेरणी अल्पच झाली आहे. त्यात गहू, हरभऱ्याची पेरणी चोपडा,यावल, शहादा भागात झाल्याची माहिती मिळाली. हरभऱ्याची पेरणी डिसेंबरमध्येही सुरू राहील. चोपडा भागात काबुली (डॉलर) हरभऱ्याची पेरणी सुरू केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com