Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : धाराशिव जिल्ह्यातील ५८ प्रकल्प कोरडेठाक

Team Agrowon

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील जलप्रकल्पांच्या पाणीपातळ्या झपाट्याने कमी होत आहेत. परिणामी जिल्ह्यात पाण्याचे संकट दिवसेंदिवस गंभीर संकट म्हणून समोर येत आहे. जिल्ह्यात एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या परंडा तालुक्यातील सिनाकोळेगाव प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याच्या खाली गेली आहे.

तर, जिल्ह्यातील १७ पैकी ११ मध्यम प्रकल्पांचीही पाणी पातळी जोत्याखाली गेली असून परंडा तालुक्यातील एक मध्यम प्रकल्प कोरडा पडला आहे. २०८ पैकी ९४ लघु प्रकल्प जोत्याच्याखाली आहेत. तर ५७ कोरडे झाले आहेत. असे एकूण १०६ प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर एकूण ५८ प्रकल्प कोरडे झाले आहेत.

दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील सर्व लघु, मध्यम व मोठे जलप्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण झाली आहे. कूपनलिका आणि नैसर्गिक स्रोत आटल्याने यात आणखी भर पडल्याने भीषणतेने गंभीर रूप धारण केले आहे. लोकांना दररोज विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. दुसऱ्या बाजूला पाणीपुरवठा योजनेवर जिल्ह्यात हजारो कोटींचा खर्च झाल्याचे दिसत असले तरी हा खर्च दुष्काळाच्या सावटाआड गडप झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात लघु, मध्यम आणि मोठे असे २२६ प्रकल्प आहेत. त्यात सर्वाधिक लघु प्रकल्पांची संख्या २०८ इतकी आहे. मध्यम प्रकल्पांची संख्या १७ आहे. तर १ मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पांपैकी सध्या ५९ प्रकल्प कोरडे झाले आहेत. यात शून्य इतका पाणी संचय आहे. जोत्याच्या खाली पाणीपातळी असलेल्या प्रकल्पांची संख्या १०५ इतकी आहे. २५ टक्के पेक्षाही कमी पाणीपातळी असलेल्या प्रकल्पांची संख्या ४४ आहे. ५० टक्क्यांहून कमी पाणीपातळी असलेले ११ प्रकल्प आहेत. ७५ टक्के पेक्षा कमी पाणीपातळी असलेले ७ प्रकल्प आहेत.

या २२६ प्रकल्पांची क्षमता ७२६.९८३३ दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात मात्र सध्या यातून ४२.५६१६ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची एकूण टक्केवारी केवळ ५.८५ इतकी आहे. मागील आठवड्यात यातून ४५.०५४२ दलघमी पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी ६.२० टक्के इतकी होती. एका आठवड्यात जवळपास तीन टक्के या प्रकल्पातील ३ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. मागील वर्षी याकाळात याच प्रकल्पातून २४७.२९९ इतका पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी ३४.०२ टक्के इतकी होती. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी तब्बल २०४.७३७४ दलघमी पाणीसाठा कमी आहे. तर जवळपास ३० टक्के पाणीसाठा यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे.

तालुकानिहाय प्रकल्पांची स्थिती

धाराशिव तालुक्यातील एकूण ४४ प्रकल्पांपैकी १० कोरडे तर १८ जोत्याच्याखाली आहेत. कळंब तालुक्यातील १७ पैकी ५ कोरडे तर ७ जोत्याच्याखाली आहेत. भूम तालुक्यातील १९ पैकी ७ जोत्याच्याखाली आहेत. परंडा तालुक्यातील १४ पैकी ५ कोरडे तर ७ जोत्याच्याखाली आहेत. वाशी तालुक्यातील १ कोरडा तर १० जोत्याच्याखाली आहेत. तुळजापूर तालुक्यातील ७१ पैकी १९ कोरडे तर ३९ जोत्याच्याखाली आहेत. उमरगा तालुक्यातील ३८ पैकी १५ कोरडे तर १४ जोत्याच्याखाली आहेत. लोहारा तालुक्यातील ८ पैकी ३ कोरडे तर ३ जोत्याच्याखाली आहेत.

मध्यम प्रकल्पांची संख्या जिल्ह्यात १७ इतकी

जिल्ह्यात सर्वाधिक २०८ लघु व साठवण तलाव आहेत. यातील सर्वाधिक ६८ लघु व साठवण तलाव तुळजापूर तालुक्यात आहेत. सर्वात कमी ८ लोहारा तालुक्यात आहेत. धाराशिव तालुक्यात ४१. उमरगा तालुक्यात ३५. कळंब आणि भूम तालुक्यात प्रत्येकी १६. वाशी तालुक्यात १४ आणि परंडा तालुक्यात १० लघु व साठवण तलाव आहेत.

मध्यम प्रकल्पांची संख्या जिल्ह्यात १७ इतकी आहे. यातील सर्वाधिक ४ मध्यम प्रकल्प परंडा तालुक्यात आहेत. तर धाराशिवसह भूम, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात प्रत्येकी ३ मध्यम प्रकल्प आहेत. कळंब तालुक्यात केवळ १ मध्यम प्रकल्प आहे. तर वाशी आणि लोहारा तालुक्यात एकही मध्यम प्रकल्प नाही. जिल्ह्यात फक्त एक मोठा प्रकल्प परंडा तालुक्यात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

Water Scheme : किकवी पेयजल प्रकल्पाला मंजुरी

Agriculture Processing : ग्रामस्तरावर प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन गरजेचे

SCROLL FOR NEXT