Buldana News: सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने धोदाडी नदीने रौद्ररूप धारण केले आणि देवखेड गावातील शरद इंद्रजित भोसले यांच्या तीन एकर सुपीक शेतीला गिळून टाकले. सोयाबीन, कपाशी, हळद असे सर्व काही वाहून गेले. तीन ते साडेतीन एकरांचा पट्टा तयार झाला. .जमिनीवर मातीच उरली नाही. हळदीच्या कंदांची मुळे उघडी पडली आणि कपाशीचा नर पूर्णपणे नष्ट झाला. त्या रात्रीचा पाऊस केवळ शेतीच नव्हे, तर शरद यांच्या स्वप्नांनाही वाहून घेऊन गेला. पण सळसळत्या रक्ताचा हा तरुण हारलेला नाही. या संकटाला सामोरे जात आता शिल्लक असलेल्या शेतीतील पिकांवर कुटुंबाचे अर्थकारण चालवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे..Farmer Protest: जातीकडून शेती-मातीकडे....शरद भोसले यांचे तीन ते साडेतीन एकर शेत संपूर्णतः वाहून गेले. त्यांच्याकडे सहा-सात एकर शेती आहे. त्यापैकी अर्धेअधिक क्षेत्र नापिक झाले. यामुळे मोठा धक्का कुटुंबाला बसला. या आपत्तीनंतर मंत्री, आमदार, अधिकारी, बांधावर आले. सर्वांनी अश्रू पुसले. पण शेतीचे जे नुकसान झालेले आहे, ते भरून देण्यासाठी पुरेशी सरकारी मदत मिळालेली नाही. लाखो रुपयांची शेती आता शिल्लक राहलेली नाही..Farmer Issue: रब्बीच्या तोंडावर पावसाचा दणका.माती गेली खरी, पण माझं धैर्य वाहून गेले नाही, असे ते सांगतात. हळूहळू या जमिनीला सुपीक करण्याचे प्रयत्न करणार आहे. सध्याच त्यात काही करता येणार नाही. जमिनीचे सपाटीकरण, शेणखत, माती टाकून ही जमीन सुधारणार असल्याचे ते म्हणाले. २२ सप्टेंबरच्या नैसर्गिक आपत्तीला दीड महिना लोटला. जमीनदोस्त हळद पिकाला नवे अंकुर फुटू लागले आहेत. त्यामुळे हळदीच्या रोपांकडे आशेने पाहत शरद निराशा झटकतात..महापुरामुळे तयार केलेल्या तीन-तीन फूट खोल चरांमुळे ही जमीन सपाट करणे, माती टाकणे हा मोठा आर्थिक फटका आहे. यंदाच्या रब्बीत त्यात पीक घेणे शक्य नाही. पण शरद आणि त्याची आई या दोघांनी खचून न जाता सावरण्याची धडपड सुरू ठेवली आहे. आईच्या हिमतीवर आणि स्वतःच्या जिद्दीवर शरद सावरत आहे. आपत्तीने जमीन नेली, पण विश्वास कायम आहे. पुन्हा शेत सुधारू. त्यावर पीक उगवेल, अशी आशा त्याने ठेवलेली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.