Mumbai News : कृषी विभागातील सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांसाठी १३ हजार २७५ लॅपटॉप खरेदी व त्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लॅपटॉप खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची राज्य सरकारने मान्यता दिली आहे. .कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना योजनांची माहिती ऑनलाइन वेब पोर्टल तसेच मोबाईल ॲपद्वारे भरावी लागते. विविध शासकीय अहवाल, योजना माहिती, कृषी आकडेवारी, ई-गव्हर्नन्स प्रणाली म्हणजेच ॲग्रीस्टॅग, डीबीटी, पीएम किसान इत्यादींचे काम सुलभपणे पार पाडण्यासाठी संगणकीय साधनांची आवश्यकता असल्याची मागणी होत होती.Agriculture Department: कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आता कायमस्वरूपी सिम कार्ड; बदली झाली तरी शेतकऱ्यांना त्याच नंबरवर संपर्क साधता येणार .सध्या क्षेत्रीय कर्मचारी विविध योजनांच्या कामासाठी स्वतःचा मोबाईल वापरतात. तसेच वेब पोर्टलवरील माहिती क्षेत्रीय स्तरावर गोळा करून नंतर मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील संगणकावर भरण्यात येते. या कामासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मंडळ किंवा तालुका कार्यालयातील संगणक सुविधांवर अवलंबून राहावे लागते..Agriculture Department: कृषी विभागातील अधिकाऱ्यांना १३ हजार सिम कार्डचे वाटप.या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कर्मचारी वर्गास लॅपटॉप पुरवठा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना मागील काही वर्षांपासून करीत होते. मात्र लॅपटॉपऐवजी टॅब घेण्याची योजना अधिकाऱ्यांनी आखली होती. मात्र त्याला विरोध करण्यात आला होता. संगणकीय कामे करण्यासाठी लॅपटॉप आवश्यक असून त्याद्वारे काम सुलभ होईल, अशी मागणी संघटनांची होती. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संघटना आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लॅपटॉपवर शिक्कामोर्तब केले होते..नमो शेतकरी महासन्मान योजनेमधून खर्चास मान्यताकृषी विभागातील सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी व कृषी अधिकारी, गट ब (क) यांना लॅपटॉप देण्याकरिता जीइएम पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया राबवून खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी लागणारा खर्च नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या प्रशासकीय खर्चातून करण्यास ही राज्य सरकारने मान्यता दिली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.