Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : आंबेगाव शिरूरच्या ५० गावांना कालव्यातील पाण्याचा फायदा

Rabi Season Irrigation : “हुतात्मा बाबू गेणू जलाशयातून (डिंभे धरण) उजव्या कालव्यात १५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News : “हुतात्मा बाबू गेणू जलाशयातून (डिंभे धरण) उजव्या कालव्यात १५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. आदर्शगाव गावडेवाडी, जारकडवाडी, पोंदेवाडीच्या पुढे शिरूर तालुक्याकडे कालव्यातील पाणी शुक्रवारी (ता.२२) मार्गस्थ झाले आहे,” अशी माहिती कुकडी पाट बंधारे विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी दिली.

कडूसकर म्हणाले की, शेतातील पिके विशेषतः गुरांचा चारा सुकू लागला होता. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न व्यवस्थेसाठी पाणी सोडले आहे. आंबेगाव व शिरूर तालुक्यातील ५० हून अधिक गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग होणार आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील मंचर (ता.आंबेगाव) येथे आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाने वळसे पाटील यांची भेट घेऊन डिंभे धरणातून उजव्या कालव्यात पाणी सोडण्याविषयी मागणी केली होती.

वळसे पाटील यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे, अशी माहिती निघोटवाडी येथील प्रगत शेतकरी बाबाजी टेमगिरे व सरपंच नवनाथ निघोट यांनी दिली. कार्डेलवाडी (ता.शिरूर) येथे १०५ किलोमीटर अंतरावर पाणी लवकरच पोचणार आहे.

आंबेगाव व शिरूर तालुक्यात उजवा कालवा, पोट चाऱ्या, घोड शाखा याद्वारे शेतजमिनीला पाणी उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाणी कोठेही वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. पाणीपट्टी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाला सहकार्य करावे.
- दत्ता कोकणे, उपअभियंता जलसंपदा विभाग, आंबेगाव-शिरूर तालुका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT