Beed Water Storage  Agroown
ॲग्रो विशेष

Beed Water Storage : बीड जिल्ह्यातील ८१ प्रकल्पांत ४२७ दलघमी साठा

Beed Rain : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (ता. नऊ) जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२१.४ टक्के पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Beed News: जिल्ह्यात यंदा समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (ता. नऊ) जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२१.४ टक्के पाऊस झाला आहे. पाटोदा तालुक्यात सर्वाधिक १४० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. समाधानकारक पावसाने आगामी वर्षातील पाण्याची चिंता मिटली आहे. १२ मध्यम आणि ६९ लघू प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत.

प्रकल्पांत सद्यघडीला ४२७. ३४ दलघमी पाणी आहे. उपयुक्त पाण्याची टक्केवारी ६०.७८ आहे. या महिन्याच्या सुरवातीला जोत्याखाली असलेल्या माजलगाव धरणात देखील जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून विसर्ग सुरु असल्याने या प्रकल्पात देखील ३६ टक्के पाणी झाले आहे.

दरम्यान, अद्यापही १४ लघू प्रकल्प जोत्याखालीच आहेत. मागच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने प्रकल्पांत पाणीवाढले नव्हते. शेवटच्या परतीच्या पावसाने काहीसा पाणीसाठा वाढला होता. यंदाही सुरवातीचा दीड महिना प्रकल्पांतील पाणीसाठा आहे बीड जिल्ह्यातील ८१ प्रकल्पांत ४२७ दलघमी साठा.

मात्र, ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा आणि या महिन्याच्या सुरवातीला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रकल्पांतील पाणीपातळी झपाट्याने वाढली. सध्या १२ मध्यम आणि तब्बल ६९ लघू प्रकल्प तुडूंब भरून तलावांच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

पावसाची वार्षिक सरासरी ५६६.१ मिलिमीटर असून आतापर्यंत ६८७.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या १२१.४ टक्के पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी आजच्या दिवशी केवळ ५३.६ टक्के पाऊस झाला होता.

जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत आजघडीला ४२७.०३४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा (६०.७८२ टक्के) आहे. माजलगाव धरणात देखील जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून विसर्ग सुरु असल्याने या प्रकल्पातील पाणीही ३६ टक्क्यांवर पोचले आहे. यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT