Water Storage : लातूरमध्ये १४४ प्रकल्पांत १४ टक्के साठा

Water Crisis : सध्या या सर्व प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा १४.८९ टक्क्यांवर आला आहे. यात तावरजा, व्हटी व तिरू हे तीन मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत.
Water Storage
Water Storage Agrowon
Published on
Updated on

Latur News : जिल्ह्याच्या दृष्टीने असलेल्या १४४ प्रकल्पातील पाणीसाठा आता हळूहळू संपत चालला आहे. सध्या या सर्व प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा १४.८९ टक्क्यांवर आला आहे. यात तावरजा, व्हटी व तिरू हे तीन मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे येत्या काळात ग्रामीण भागाला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्यासह काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने प्रकल्पांतील पाण्यावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात १४४ प्रकल्प आहेत. यात मांजरा व निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत सध्या ३४.२३३ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. याची टक्केवारी १२.७६ इतकी आहे. यात मांजरा धरणात १४.३९ टक्के तर निम्न तेरणा प्रकल्पांत ९.६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे.

Water Storage
Water Shortage : बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाईचे संकट गडद

जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. यात सध्या १७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. याचे टक्केवारी १३.९४ इतकी आहे. यात तावरजा, व्हटी व तिरू हे तीन प्रकल्प हा कोरडे पडले आहेत. या प्रकल्पात पाणीसाठा शून्यावर आला आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात सध्या २.७६७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे.

Water Storage
Water Shortage : बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांत पाणीसाठ्यात मोठी घट

याची टक्केवारी १३.४६ इतकी आहे. देवर्जन प्रकल्पात १८.६२ टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पात १.९८९ दशलक्ष घनमीटर पाणी राहिले आहे. साकोळ प्रकल्पात २.७२० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा राहिला असून याची टक्केवारी २४.८४ इतकी आहे.

घरणी मध्यम प्रकल्पात ४.५१६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याची टक्केवारी २०.१० इतकी आहे. मसलगा प्रकल्पात ५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून याची टक्केवारी ३७ इतकी आहे. जिल्ह्यात १३४ लघू प्रकल्प आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com