Drip Irrigation Agowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : साताऱ्यातील ३,५०० शेतकऱ्यांची ठिंबक अनुदानासाठी प्रतीक्षा सुरू

Waiting for Drip Irrigation Subsidy : सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून ठिबकचे अनुदानच शेतकऱ्यांना मिळालेले नाही. यामध्ये गेल्या वर्षीचे केंद्राकडून मिळणारे साडेसात कोटींचे तर राज्य शासनाकडून मिळणारे दीड कोटीचे अनुदान थकले आहे.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून ठिबकचे अनुदानच शेतकऱ्यांना मिळालेले नाही. यामध्ये गेल्या वर्षीचे केंद्राकडून मिळणारे साडेसात कोटींचे तर राज्य शासनाकडून मिळणारे दीड कोटीचे अनुदान थकले आहे. साडे तीन हजार शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

केंद्र व राज्य शासनाचा ६०:४० चा हिस्सा असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेतून ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून शेतातील पिकांना पाणी देण्याची व्यवस्था केल्यामुळे शेतकऱ्यांना खर्चाच्या ८० टक्के रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. यामध्ये पीकनिहाय अनुदानाच्या रकमेत बदल होतो.

एकरी २५ ते ३० हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याची तरतूद आहे. शेतकऱ्याने प्रस्ताव दाखल केल्यानंतर पाहणी करून या प्रस्तावास कृषी विभागाकडून मंजुरी मिळते. यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करण्यावर शेतकरी भर देत आहेत.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेत सहभाग घेतला. यामध्ये २५३० शेतकऱ्यांचे तब्बल सात कोटी ४५ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

आज मिळेल उद्या मिळेल या आशेवर शेतकरी बसला आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी विकास योजनेतून २०२३-२४ मध्ये ५९ शेतकऱ्यांचे आठ लाख ९७ हजार रुपयांचे अनुदान राज्य शासनाकडून मिळणे बाकी आहे. तसेच २०२४-२५ मधील ८८९ शेतकऱ्यांचे एक कोटी ४० लाख ४१ हजार रुपयांचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३४७८ शेतकरी ठिबक अनुदानाची वाट पाहात आहेत.

अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले तालुकानिहाय शेतकरी व कंसात रक्कम

सातारा २५१ (७०.६६), कोरेगाव ७४७ (२३८.५१), खटाव ४८४ (१२५.५९), कराड २४४ (७८.११), पाटण ३७ (१४.०५), वाई ६९ (२१.३४), जावळी २५ (६.५८), खंडाळा ४० (९.२९), फलटण ४८४ (१५१.८८), माण १४७ (२९.३९).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT