Drip Irrigation : वर्षानूवर्ष असा टिकवा ठिबक सिंचन संच

Team Agrowon

योग्य दाबावर ठिबक संच चालवावा

Drip Irrigation | Agrowon

हंगामानुसार पिकाची पाण्याची गरज वेगवेगळी असते. संच चालविण्याचा कालावधीही वेगवेगळा असतो. साधारणपणे उन्हाळ्यामध्ये ३ तास, हिवाळ्यामध्ये २ तास आणि पावसाळ्यात पाऊसमान बघून आवश्यकतेनुसार एक तास ठिबक सिंचन संच सुरू ठेवावा.

Drip Irrigation | Agrowon

सबमेनवरील फ्लश व्हॉल्व्ह खोलून सबमेन साफ करावी. जाळीचा फिल्टर, डिस्क फिल्टर फ्लश करावा.

Drip Irrigation

आठवड्यातून एकदा संपूर्ण संचाची आणि सर्व फिटिंग व्यवस्थित आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. गरज असेल तिथे लगेच दुरुस्ती करून घ्यावी.  

Drip Irrigation

लॅटरल सरळ रेषेत अंथरलेली असावी. एंड कॅप व्यवस्थित बसविलेली असावी.
  साधारणपणे दोन महिन्यांतून एकदा तोट्यामधून मिळणारा प्रवाह तपासावा.

Drip Irrigation

व्हेंच्यूरीमधून फक्त पाण्यात विरघळणारी किंवा द्रवरूप खते द्यावीत. खत व पाणी यांचे प्रमाण साधारणत: १:१० असावे.

Drip Irrigation

डिझाइन केलेल्या दाबानुसार फिल्टर इनलेटवर आवश्यक दाब असल्याची खात्री करावी.
  वाळूची गाळण यंत्रणा फ्लशिंग पद्धतीने साफ करावी.

Guava Eating : 'हे' फळ थंडीत का खावे, ४ पटीने रोगप्रतिकार शक्ती वाढेल

आणखी पाहा...