Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनी धरणातून शेतीला यंदा गरजेनुसार सुटणार ३ आवर्तने, १११ टीएमसी पाणीसाठी शिल्लक

Solapur Ujani Dam : गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असून सध्या धरणात १२ महिने पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

sandeep Shirguppe

Solapur Water : यंदा सोलापूर जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्याने ४ ऑगस्टपूर्वीच उजणी धरण भरले. यामुळे धरणातून भीमा नदी, कॅनॉल, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडून द्यावे लागले. मागील दोन महिन्यांत धरणातून तब्बल १०६ टीएमसी पाणी सोडून द्यावे लागले आहे. अजूनही उजनीत दौंडवरून २ हजार ८०० क्युसेकचा विसर्ग सुरू असून, धरण सध्या १११ टक्के भरले आहे. त्यामुळे आगामी आठ दिवसांत विसर्ग बंद झाल्यावर उजनीचे सगळेच दरवाजे पुढे तीन महिन्यांसाठी बंद केले जाणार आहेत.

सोलापूर शहर, धाराशिव, कर्जत- जामखेड, इंदापूरसह सोलापूर जिल्ह्यातील १३० हून अधिक ग्रामपंचायती, एमआयडीसी व साखर कारखान्यांना आणि १ लाख ५० हजार हेक्टरला उजनीच्याच पाण्याचा आधार आहे. शेतीशिवाय एकूण ४३ योजना उजनी धरणावर अवलंबून आहेत. गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असून सध्या धरणात १२ महिने पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

या पार्श्वभूमीवर जानेवारीअखेर शेतीला पहिले आवर्तन तर मार्चअखेर किंवा एप्रिलच्या सुरवातीला दुसरे आवर्तन आणि मेअखेर गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडले जाऊ शकते. धरणातील पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीत निश्चित होणार असून, समितीची बैठक आता नवीन सरकार सत्तेवर आल्यावर डिसेंबरअखेर होणार आहे.

देगाव योजनेतून पहिल्यांदा सुटणार पाणी

दक्षिण सोलापूर व अक्कलकोटमधील अनेक गावांना फायदा होईल अशा देगाव उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा काही दिवसांत पूर्ण होणार आहे. सध्या देगावजवळील रेल्वे पुलाचे काम सुरू असून १५ दिवसांत ते पूर्ण होईल, अशी सद्य:स्थिती आहे.

जानेवारी- फेब्रुवारीत सुटणाऱ्या पहिल्या आवर्तनाचे पाणी देगाव उपसा सिंचन योजनेतून पहिल्यांदाच सुटणार आहे. सुरवातीला दक्षिण सोलापुरातील सहा हजार हेक्टरला त्यातून पाणी मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT