Kolhapur Jaggery Market : कोल्हापूर बाजारात गुळाची आवक वाढली; साखर हंगाम लांबणीचा गुऱ्हाळांना फायदा, कांद्यालाही दर

Jaggery Rate : गुळाचा दर प्रतिक्विंटल ४७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कांद्यालाही चांगला दर मिळत असून, चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल ५२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
Kolhapur Jaggery Market
Kolhapur Jaggery Marketagrowon
Published on
Updated on

Jaggery Market : यंदाचा साखर हंगाम लांबल्याने गुऱ्हाळांचे धुराडे लवकर पेटले आहे. यामुळे कोल्हापूर बाजार समितीत गुळाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. याचबरोबर कांद्याचीही आवक वाढली आहे. परंतु गूळ आणि कांद्याच्या दरात तेजी असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे.

गुळाचा दर प्रतिक्विंटल ४७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कांद्यालाही चांगला दर मिळत असून, चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल ५२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

मागच्या एक महिन्यापासून कांदा दरात तेजी दिसून येत आहे. कोल्हापूर बाजार समितीत दररोज १० ते ११ हजार पिशव्यांची आवक होत आहे. एकदम हलक्या कांद्याला प्रतिक्विंटल १५००, तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला ५ हजारापेक्षा अधिक दर मिळत आहे. यंदा १५ नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे गुहाळघरे जोमात सुरू आहेत. गेल्या तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील बहुतांशी गुहाळघरे सुरू आहेत.

गेल्या हंगामात १ एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत ६ लाख ९२ हजार ८७३ गूळ रव्यांची आवक झाली होती. तर, या हंगामात आतापर्यंत ७ लाख २२ हजार ४६६ रव्यांची आवक झाली असून, गेल्या हंगामापेक्षा २९ हजार ५९३ गूळ रव्यांची आवक जास्त आहे.

Kolhapur Jaggery Market
Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

पाडव्याला गूळ सौदा होणार

दरम्यान बाजार समितीच्या गूळ मार्केटमध्ये शनिवारी (दि. २) बलिप्रतिपदा दीपावली पाडव्यानिमित्त सकाळी साडेनऊ वाजता शेतकरी सेवा अडत दुकानात गुळाचा मुहूर्तावर सौदा काढण्यात येणार आहे. तरी, शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल-तोलाईदारांसह संबंधित घटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com