Department Of Animal Husbandry  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Animal Husbandry Recruitment: ‘पशुसंवर्धन विभागातील ’२७९५ रिक्त पदे भरण्यात येणार!

Government Jobs Maharashtra: पशुसंवर्धन विभागातील काम अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारने पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) मागणी पत्र सादर करण्यात आले आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी पशुसंवर्धन सेवा गट ‘अ’ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पशुसंवर्धन विभागाने तसे मागणी पत्र सादर केल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आयुक्तालय तसेच त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारीपद महत्त्वाचे आहे. सुधारित आकृती बंधानुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट ‘अ’ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण ४६८४ पदे मंजूर आहेत.

त्यापैकी सद्यःस्थितीत १८८६ पदे भरलेली असून, २७९८ पदे रिक्त आहेत. तसेच ३१ डिसेंबर २०२५ अखेर ८ पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहेत, असे एकूण २८०६ पदे रिक्त होणार आहेत. ही पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत होता.

त्यामुळे पशुधन विकास अधिकारी संवर्गातील पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या पैकी सरळसेवा जाहिरातीमधील प्रतीक्षा यादीतील ११ पदे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित २७९५ पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सूचित करण्यात आले आहे. रिक्त पदे भरल्यानंतर विभागाचे कामकाज अधिक वेगाने होऊन ग्रामीण भागातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवांना चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध होईल, असेही मुंडे म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Gender Platform : आयसीएआरने केली 'राष्ट्रीय जेंडर प्लॅटफॉर्म'ची घोषणा; ९०० संस्थांना जोडण्यात येणार

Supreme Court On Pulses MSP : कडधान्य आयात आणि हमीभावाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिले केंद्र सरकारला निर्देश; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

Rice Export Issue: युद्धामुळे भारताच्या तांदूळ निर्यातीत अडथळे

Natural Farming: मानवी आरोग्यासाठी नैसर्गिक शेती गरजेची : डॉ. मणी

Tomato Farming: हंगामनिहाय नियोजनातून दर्जेदार टोमॅटो उत्पादनासाठी प्रयत्न

SCROLL FOR NEXT