Animal Husbandry Department: ‘पशुसंवर्धन’ला कृषीचा दर्जा मिळणार? प्रस्तावावर लवकरच निर्णय!

Agriculture Status: महाराष्ट्रातील पशुसंवर्धन क्षेत्राला कृषीप्रमाणेच अनुदान व सवलती मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. पशुसंवर्धन आयुक्तांनी हा प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठवला असून, लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
Department Of Animal Husbandry
Department Of Animal Husbandry Agrowon
Published on
Updated on

Nagpur News: देशात अनेक राज्यांमध्ये शेतीपूरक पशुसंवर्धन क्षेत्राला अनुदानाचा लाभ दिला जातो. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील पशुसंवर्धन क्षेत्राचा कृषीत समावेश करून कृषी अनुदानाचा लाभ पशुपालकांना दिला जावा, असा प्रस्ताव पशुसंवर्धन आयुक्‍त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी कृषी, पशुसंवर्धन सचिवांना पाठविला आहे. या प्रस्तावावर लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

प्रस्तावानुसार, महाराष्ट्रात कृषी व पशुसंवर्धन हे अर्थव्यवस्थेचे दोन परस्परावलंबी घटक आहेत. कृषी क्षेत्राला अनेक अनुदान, कर सवलती, प्रोत्साहन योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळेच पशुसंवर्धन क्षेत्राला कृषी समकक्ष लाभ देण्यासाठी धोरणात्मक बदलाची शिफारस करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राज्य मूल्यवर्धित उत्पादनात २३.५३ टक्‍के हिस्सा कृषी व संलग्नित क्षेत्राचा आहे.

Department Of Animal Husbandry
Animal Husbandry : पशुपालनाने ग्रामीण भागात आर्थिक क्रांती

त्यातील पशुसंवर्धनचे योगदान २५ टक्‍के आहे. राज्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात पशुसंवर्धन व्यवसायाचा वाटा २.४ टक्‍के आहे. त्यानुसार पशुसंवर्धन क्षेत्राचा विकास दर ४.५ टक्‍के आहे. असे असतानाही या क्षेत्रासमोर मोठी आव्हाने आहेत. त्यामध्ये कृषीच्या तुलनेत कमी आर्थिक प्रोत्साहन, चारा, खाद्यावर वाढता खर्च, अपुरी पशुधन विमा योजना, कर सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन कृषीसारखे नसणे यांचा मुख्यत्वे समावेश आहे.

पशुसंवर्धनासाठी घेतलेल्या कर्जावर व्याजदर तुलनेत जास्त असतो आणि त्याच्या परतफेडीच्या अटी देखील जाचक असतात. बाजारपेठेत पशुपालकांना अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासही शेतकरी आणि उद्योजक इच्छुक नसतात. कृषी उत्पन्नावर कोणताही कर नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो. त्यामुळेच कृषी क्षेत्रासारखेच प्रोत्साहन आणि धोरणात्मक पाठबळ पशुसंवर्धन क्षेत्राला मिळण्याची गरज आहे. पशुसंवर्धनमुळे महिला आणि लहान शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळण्यास मदत होते, असेही निरीक्षण आहे.

Department Of Animal Husbandry
Department Of Animal Husbandry : नाशिक जिल्ह्यात १८ पशुधन पर्यवेक्षकांना पदोन्नती

...अशा आहेत शिफारशी

कृषी व्यवसायासाठी असलेल्या सर्व कर सवलती पशुसंवर्धन व्यवसायाला लागू कराव्यात, पशुसंवर्धन व्यवसाय व चारा उत्पादनाला कृषीचा दर्जा देत त्या अनुसार वीजदर, सोलर व आनुषंगिक लाभ मिळावे. चारा, पशुवैद्यकीय सेवा आणि पशुपालनाच्या पायाभूत सुविधांवर अनुदान. पशुधन विमा हा कृषी विमा योजनेत समाविष्ट करावा. दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री तसेच चारा उत्पादनासाठी अल्प दराने कर्ज उपलब्धता. दुग्ध आणि मांस व्यवसायासाठी सहकारी संस्था तसेच विपणन व्यवस्थांचे बळकटीकरण.

...अशी आहे ‘पशुसंवर्धन’ची स्थिती

- देशातील पाच प्रमुख दुग्ध उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.

- पंजाबच्या तुलनेत भांडवली खर्च अधिक व उत्पन्न कमी.

- महाराष्ट्रात पोल्ट्रीला क्षेत्राला वाव. रोज १ कोटी अंड्यांची तूट.

- मराठवाडा, विदर्भात शेळी-मेंढीपालनावर भर.

शेतकरी स्वमालकीच्या जागेत दुग्ध किंवा पोल्ट्री व्यवसाय उभारतात. त्यातून बारमाही शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत तयार होतो. मात्र राज्य सरकारकडून कोणतीच सवलत न देता त्यांच्याकडून रेडीरेकन दरानुसार कर आकारणी होते. वीज देयकासाठी देखील व्यावसायिक दर आहे. यात सवलत मिळाली पाहिजे.
शरद गोडांबे, सदस्य, कुक्‍कुट समन्वय समिती
तेलंगणामध्ये ग्रामपंचायत कर प्रति कुक्‍कुट पक्षिगृह प्रति वर्ष अवघा १०० रुपये इतका आहे. कर्नाटकमध्ये देखील ग्रामपंचायत करात सवलत आहे. त्यामुळे त्या राज्यांमध्ये कुक्‍कुटपालन खर्चात कपात झाली आहे. अशाच सवलती महाराष्ट्रात मिळाल्यास येथील शेतकरी इतर राज्यांशी स्पर्धा करतील.
शुभम महाले, संचालक, अमरावती जिल्हा पोल्ट्री असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com