Loan Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Women Self Help Group : बचत गटांना २७१ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट

Loan For Women Self Help Group : महिला आर्थिक विकास महामंडळ (मआविम) व उमेद यांच्या मार्गदर्शनाखाली पावणेचार लाख महिलांचे ३२ हजार ९०० बचतगट कार्यरत आहेत.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळ (मआविम) व उमेद यांच्या मार्गदर्शनाखाली पावणेचार लाख महिलांचे ३२ हजार ९०० बचतगट कार्यरत आहेत. ‘उमेद’कडून बचतगटांमधील महिलांना २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३२० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट असून, अजून जवळपास १०० कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे. तर ‘मआविम’च्या माध्यमातून बचतगटांना १७१ कोटींच्या कर्जवाटपाचे नियोजन आहे.

किमान दहा महिलांचा बचत गट स्थापन झाल्यावर सुरवातीला ३० हजारांचा फिरता निधी दिला जातो. त्यानंतर सहा महिन्यांनी समुदाय गुंतवणूक निधी म्हणून ६० हजार रुपये दिले जातात. सारखाच उद्योग करणाऱ्या १५ ते २० महिला एकत्रित आल्यास त्यांना दोन लाख रुपयांचा निधी मिळतो. त्यातून उद्योगवाढ व्हावी व त्या स्वावलंबी व्हाव्यात हा हेतू आहे.

जिल्हा उद्योग केंद्र, कृषी विभाग आणि स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत उद्योग उभारल्यास महिला बचतगटांना ३५ ते ६० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. सुरवातीला बचतगटांचा उद्योग वाढावा म्हणून बॅंकांकडून दीड लाखांचे कर्ज मिळवून दिले जाते. त्याची परतफेड नियमित झाल्यास १५ ते २० लाखांपर्यंतही कर्ज मिळते.

त्यासाठी ‘उमेद’कडून महिला बचत गटांना मदत केली जाते. तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी ‘उमेद’कडून बचत गटांना चार टक्के अनुदान (व्याज परतावा) दिले जाते. वस्तूंच्या मार्केटिंग व ब्रॅण्डिंगसाठीही ‘उमेद’कडून मदत केली जात आहे.

सांगोल्यातील शेगाव्याची मोरिंगा पावडर, माढ्यातील कलाकुसरीच्या वस्तूंना चांगले मार्केट मिळू लागले आहे. मोरिंगा पावडरने ब्राझिलपर्यंत मजल मारली आहे. ‘उमेद’च्या माध्यमातून मदत मिळालेल्या ७० हजारांहून अधिक महिला सध्या स्वावलंबी झाल्या आहेत.

महिलांना ‘नवतेजस्विनी’चा आधार

समुहाने व्यवसाय करणाऱ्या महिला बचतगटांना आता नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्योम विकास प्रकल्पाअंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास साडेचार हजार महिला बचतगटांना जिल्ह्यातील विविध बॅंकांच्या माध्यमातून यंदा १७१ कोटींचे कर्ज दिले जाणार आहे.

पार्क चौकातील गाळ्यात वस्तूंचे मार्केटिंग

जिल्ह्यातील बचत गटांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या उत्पादनांचे मार्केटिंग व ब्रॅण्डिंग व्हावे म्हणून जिल्हा विक्री केंद्र तयार करण्यात येणार आहे. पार्क चौकातील नेहरू वसतीगृहाजवळील दोन गाळ्यांमध्ये त्या वस्तू विक्रीसाठी असणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन सुरू आहे. आता वस्तू व पदार्थांची निवड करण्याची कार्यवाही सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT