Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : जळगावसह पाच जिल्ह्यांत २२ साखर कारखान्यांचे गाळप सुरू

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी ११ लाख ५६ हजार ४४१ टन उसाचे गाळप केले. यातून सरासरी ७.०२ टक्‍के साखर उतारऱ्याने ७ लाख ५२ हजार २६३ क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

या कारखान्यांत जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या पाच जिल्ह्यांतील १३ सहकारी व ९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यात एकही कारखाना सुरू नसल्याची स्थिती आहे.

यंदाच्या ऊसगाळप हंगामावर दुष्काळाचे मोठे सावट आहे. छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया अंतर्गत सहा जिल्ह्यांतून सप्टेंबरअखेर ऑनलाइन २९ कारखान्यांनी ऊस गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. त्यापैकी तीन कारखान्यांचे अर्ज अपूर्ण असल्याने २६ कारखान्यांचे अर्ज परवान्यासाठी कायम राहिले.

२२ कारखान्यांनी गाळप सुरू केल्यामुळे या पाचही जिल्ह्यांतील कारखान्यांची सरासरी दैनंदिन गाळप क्षमता ८४ हजार ९०० टन झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील दोन, बीडमधील एक अशा तीन कारखान्यांना अजून परवाना नाही व ते सुरूही नाहीत. तर बीडमधील एक कारखाना परवाना तूर्त प्राप्त नसला तरी सुरू असल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

गतवर्षी या ६ जिल्ह्यांत जवळपास १ कोटी ९ लाख ३९ हजार ६१२ टन उसाचे गाळप झाले होते. यातून १ कोटी ९ लाख ७१ हजार ६३१ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. त्यावेळी जवळपास २ लाख ३५ हजार ४०० हेक्‍टर क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होते, तर दहा एप्रिलला मराठवाड्यातील सर्व कारखान्यांची गाळप थांबले होते.

आतापर्यंतचा गाळप हंगाम (ऊस टनांत)

(साखर क्‍विंटलमध्ये)(उतारा टक्के)

जिल्हा कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन उतारा

नंदूरबार २ ९०१३८ ६०५१८ ६.२१

जळगाव २ ४६९४० २९१५० ६.९१

छ.संभाजीनगर ६ २४१९७३ १७७४५५ ७.३३

जालना ५ २९००४९ २०९३०५ ७.२२

बीड ७ ४८७३४२ २७५८३५ ५.६६

यंदा गाळपासाठी २ लाख १५ हजार हेक्‍टर क्षेत्र

छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया अंतर्गत सहा जिल्ह्यांत कारखान्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास २ लाख ५२ हजार हेक्‍टर क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होते. त्यानंतर कृषी विभाग व प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या संयुक्त पाहणीनुसार जवळपास २ लाख १५ हजार हेक्‍टरवरील ऊस यंदाच्या गाळपासाठी उपलब्ध आहे. यामधून प्रतिहेक्‍टर अंदाजे ६७ टन ऊस उत्पादन अपेक्षित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT