Solapur News : तालुक्यातील चारही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. मात्र उसाच्या फडातून ट्रॅक्टर कारखान्याकडे निघाल्यावर रस्त्याने ट्रॉलीमधील ऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे, याचे ना ऊस तोडणाऱ्या टोळीला ना चालकाला घेणे- देणे. अगोदरच पाऊस नसल्याने उसाच्या वजनात मोठी घट झाली आहे.
त्यात असा ऊस रस्त्याने पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. साखर कारखान्यातील शेती विभागाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी व अशा बेफिकीर चालकाला लेखी समज द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
मोहोळ तालुक्यातील भीमा, जकराया, लोकनेते, आष्टी शुगर या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. ऊसतोडणी टोळ्या, ऊसतोडणी यंत्रणा कामाला लागली आहे. शेतकरी आपला ऊस टोळ्या म्हणतील तसा गाळपासाठी पाठवत आहे. उसाच्या फडात ट्रॅक्टरची ट्रॉली उसाने भरल्यावर भरलेल्या उसाला मजबूत रस्सीने बांधणे गरजेचे आहे.
चालकानेही खराब रस्त्याने ट्रॅक्टर जाताना लक्ष ठेवणे अनिवार्य आहे. मात्र असे होताना दिसत नाही. कच्च्या रस्त्यात हेलकाव्याने उसाला बांधलेली रस्सी ढिली होते. परिणामी उसाच्या मोळ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडतात. दुर्दैव म्हणजे चालक याकडे लक्ष देत नाहीत. तो कारखाना जवळ करायच्या मार्गावर असतो, तसेच रस्त्यात काय झाले याची माहिती ऊस मालकालाही नसते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, वजनातही मोठी घट होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.