Sugarcane Season : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक करणारी वाहने रोखली

Sugarcane FRP : यंदाचा हंगाम सुरु होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गत हंगामातील पाचशे रुपये अशी मागणी सुरु केली.
Maharashtra Sugarcane Season
Maharashtra Sugarcane Seasonagrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामातील ऊस दर आणि मागील हंगामातील चारशे रुपये देण्याबाबत मौन बाळगले असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.

शेतकरी संघटना आता रस्त्यावर उतरून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहने अडवू लागले आहेत. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला असल्याचे चित्र आहे.

यंदाचा हंगाम सुरु होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गत हंगामातील पाचशे रुपये अशी मागणी सुरु केली. त्यानंतर ऊस परिषदेत यंदाच्या हंगामात पहिली उचल ३५०० रुपये द्यावेत अन्यथा ऊस तोड बंद करु असा इशारा दिला होता. जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरासाठी आंदोलन करत आहेत.

Maharashtra Sugarcane Season
Sugarcane Season : गळीत हंगाम ः चिंता अन् चिंतन

गावागावात जाऊन सुरु असलेली ऊस तोड बंद पाडत आहेत. रात्रीच्या वेळी सुरु असलेली ऊस वाहतूक रस्त्यात अडवत आहेत. सांगली जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या मौजेडिग्रज गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी

शुक्रवार (ता. १७) रात्री मौजे डिग्रज, कसबे डिग्रज दरम्यान पुलावर सर्वोदय व दत्त इंडिया या कारखान्याकडे जाणारी अनेक वाहने पुलावर आलेली लक्षात येताच वाहने आडवण्यात आली. रात्रीपासून सुमारे १०० ट्रॅक्टर अडवण्यात आले. वाहनांच्या लांब रांगा लागल्‍या होत्या.

Maharashtra Sugarcane Season
Sugarcane Season : गळीत हंगामाची यंदा अग्निपरीक्षा

‘आर या पार’ ची लढाई करण्याचा निर्धार शेतकरी संघटना कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी केला आहे. कोणत्याही स्थितीत ही वाहने सोडणार नसल्याची भूमिका मांडली आहे. गावागावात शेतकरी संघटनेचे नेते पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी ठाण मांडून आहेत.

कारखानदार व प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे आता गत हंगामातील चारशे रुपये आणि यंदाच्या हंगामातील पहिली उचल ३५०० रुपये घेतल्याशिवाय आंदोलन मागे नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com