Livestock Survey Agrowon
ॲग्रो विशेष

21st Livestock Census: राज्यात २१ वी पशुगणना पूर्ण, माहिती लवकरच होणार जाहीर

Livestock Survey 2025: राज्यातील पशुधनाविषयी अचूक माहिती मिळवण्यासाठी करण्यात आलेली २१ वी पशुगणना पूर्ण झाली आहे. ५१ हजारांहून अधिक गावांतील पशुधनाची माहिती गोळा करून ती केंद्र सरकारला सादर करण्यात आली असून, लवकरच अंतिम आकडेवारी जाहीर होणार आहे.

गणेश कोरे

Pune News: राज्यातील पशुधनाची अचूक माहिती संकलित व्हावी आणि याद्वारे पशुपालनाचे धोरण तयार करण्यासाठी होत असलेली पशुगणना अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यभरात झालेल्या पशुगणनेची आकडेवारी केंद्र सरकारला सादर करण्यात आली आहे. या आकेवारीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकार लवकरच ही माहिती जाहीर करणार असल्याचे पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले.

राज्यात ॲपद्वारे संगणकीय २१ व्या पशुगणनेला २५ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला. ही गणना ३१ मार्चअखेर संपविण्यात आल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. ही गणना ५१ हजार ७५८ गावांमधील वाड्या-वस्त्यांवर करण्यात आली. यासाठी ९ हजार प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. या गणनेमध्ये विविध १६ प्रकारच्या पशुधन आणि विविध कुक्कुटादी पक्षी यांची जात, वय लिंगनिहाय आकडेवारीचे संकलन करण्यात आले आहे.

२० व्या पशुगणनेनुसार राज्यात ३ कोटी ३० लाख ८० हजार पशुधन होते. या पशुगणनेत १९ व्या पशुगणनेनुसार १.९३ टक्के वाढ झाली होती. आता २१ व्या पशुगणेनुसार त्यात वाढ झाली की घट हे लवकरच केंद्र सरकार जाहीर करणार आहे. या पशुगणनेनुसार प्रत्येक राज्याचे पशुपालनाचे धोरण आणि योजना आखल्या जाणार असल्याचे पशुसंवर्धन विभागातील सूत्रांनी सांगितले.

पशुधनात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर

२० व्या पशुगणनेनुसार देशात महाराष्‍ट्र सातव्या क्रमांकावर आहे. तर कुक्कुटमध्ये पाचव्या स्थानावर आहे. आता २१ व्या पशुगणनेत महाराष्ट्राचे स्थान अव्वल राहील की घटेल, हे समजणार आहे.

या पशुधनाची झाली गणना

पशुधनामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह, गाढव, घोडे, शिंगरे, खेचरे, हत्ती, उंट, श्‍वान, ससे, कुक्कुट व कुक्कुटादी पक्षी, यामध्ये कोंबड्या, बदके, टर्की, क्वेल, शहामृग, गिनी, इमू, हंस याबरोबरच भटकी कुत्री आणि गायींचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT