Livestock Census: देशात पशुगणनेच्या कामाला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

Government Extension: देशभरात सुरू असलेल्या २१ व्या पशुगणनेचे काम अपेक्षित वेगाने न झाल्याने केंद्र सरकारने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
Animal Census
Animal CensusAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: देशात होणाऱ्या २१ व्या पशुगणनेचे काम अपेक्षित प्रमाणात झाले नाही. त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत निर्धारित या गणनेच्या कामाला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यःस्थितीत देशातील ७६,२३२४ गणना युनिटच्या माध्यमातून केवळ २६ टक्‍केच काम झाले आहे, त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पशू, मत्स्यपालन तसेच दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या माध्यमातून देशात एकविसावी पशुगणना होत आहे. या वेळच्या पशुगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे भटकंतीवरील, मोकाट तसेच गोशाळेतील जनावरांची देखील मोजदाद केली जाणार आहे. त्यामुळे यावेळी पशुगणना अचूक होईल, असा विश्‍वास पशुपालन क्षेत्रात कार्यरत व्यक्‍तींकडून व्यक्‍त केला जात आहे.

Animal Census
Livestock Census : पशुगणनेसाठी प्रगणकांची संख्या तोकडीच

याकरिता केंद्र सरकारकडून अधिसूचना काढण्यात आल्यानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत देशभरातील पशुगणनेचे काम पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही पशुगणना युनिटला अपेक्षित उद्दिष्टपूर्तीचा पल्ला गाठता आला नाही. त्यामुळेच पशुगणना कार्याला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Animal Census
Livestock Census : सिंधुदुर्गातील १५६ गावांतील पशुगणनेचे काम पूर्ण

पशुगणनेच्या कामी गाव आणि शहरस्तरावर ठरावीक कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या युनिटची बांधणी करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत ७६,२३२४ गणना युनिटचे काम २६ टक्‍के पूर्णत्वास झाले आहे. ४६ टक्‍के काम प्रगतिपथावर असून, २७ टक्‍के गणना युनिटचे काम अद्यापही सुरूच झाले नाही.

त्यामुळेच देशातील अनेक राज्यांनी पशुगणनाकार्याला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. याची दखल घेत केंद्र सरकारकडून पशुगणनेच्या कामाला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मर्यादित वेळेत राज्य सरकारस्तरावर पशुगणनेचे काम पूर्णत्वास जावे, अशी अपेक्षाही या संबंधीच्या आदेशात व्यक्‍त करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com