
Sangali News : सांगली : जिल्ह्यातील पशुगणना अंतिम टप्प्यात असून, मार्चअखेर ८४७ गावांत पशुगणना ९१ टक्के पूर्ण झाली आहे, तर ६२ गावांतील गणना बाकी आहे. जिल्ह्यातील गणना वेळेपूर्वीच पूर्ण होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास ११ लाख ६३ हजार २२६ पशुधनाची नोंद झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.
केंद्र शासनाच्या वतीने यंदा प्रथमच ऑनलाइन पशुगणना होत आहे. यामध्ये १६ प्रजातींची नोंद करण्यात येत आहे. गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळी, मेंढी, घोडा, गाढव, कुत्रा, मांजर, डुक्कर आदी पशुधन तसेच कोंबड्यांचीही गणना केली जात आहे. शासनाच्या निर्णयानुसार २५ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी अशी पशुगणना करण्यात येणार होती; पण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर पशुगणनेला सुरुवात झाली. परिणामी, या मोहिमेला उशीर झाला असून, पशुगणना करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे.
एक पशुगणनेसाठी जिल्ह्यात २५० प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रगणकांनी गावात फिरून अॅपमध्ये ऑनलाइन नोंद करायची आहे. तसेच प्रगणकांना
गावे वाटून दिली आहेत. एका प्रगणकाला ग्रामीणमध्ये तीन हजार, तर शहरात चार हजार कुटुंबांना भेट द्यायची आहे. प्रगणकांवर लक्ष ठेवण्यासाठी पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात एक महिना उशिरा पशुगणना सुरू झाल्याने एक महिन्याची मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र या कालावधीत सुद्धा पशुगणना पूर्ण होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे पुन्हा पंधरा दिवसांची वाढ दिली आहे. यामुळे १५ एप्रिलपर्यंत पशुगणना पूर्ण करावी लागणार आहे.
जिल्ह्यात ३८ लाखांवर कोंबड्या
जिल्ह्यातील सर्व गावांत आणि कुटुंबापर्यंत जाऊन पशुधनाची नोंद करायची आहे. आतापर्यंत ८४७ गावांत ११ लाख ६३ हजार २२६ पशुधनाची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंत ३८ लाख २७ हजार ६८४ कोंबड्यांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील पशुगणनेचे काम जवळपास ९१ टक्के पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून पशुगणना सुरू आहे. शासनाने पशुगणनेसाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील मोहीम पूर्ण होईल. जिल्ह्यातील पशुगणनेची आकडेवारी सकारात्मक आहे.
- डॉ. अजयनाथ थोरे, उपायुक्त, पशुसंवर्धन
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.