Agriculture Loan  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Loan : रब्बीत २०६ कोटी ५१ लाख रुपये नवीन पीककर्ज वाटप

Distribution of Crop Loans : यंदाच्या (२०२३-२४) रब्बी हंगामात २९ फेब्रुवारी अखेर परभणी जिल्ह्यातील विविध बँकांनी ५३ हजार ७१० शेतकऱ्यांना ४३२ कोटी ८४ लाख रुपये (५८.११ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२३-२४) रब्बी हंगामात २९ फेब्रुवारी अखेर परभणी जिल्ह्यातील विविध बँकांनी ५३ हजार ७१० शेतकऱ्यांना ४३२ कोटी ८४ लाख रुपये (५८.११ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

त्यात ३२ हजार ३५६ शेतकऱ्यांना २०६ कोटी ५१ लाख रुपये एवढे नवीन पीककर्ज देण्यात आले, तर एकूण २१ हजार ३५४ शेतकऱ्यांनी २२६ कोटी ३३ लाख रुपये एवढ्या पीककर्जाचे नूतनीकरण केले आहे.

परभणी जिल्ह्यातील १७ बँकांना यंदाच्या रब्बी हंगामात ७४४ कोटी ८३ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यात व्यापारी बँकांना (राष्ट्रीयीकृत) एकूण ४४२ कोटी ८ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १६१ कोटी ९१ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण ग्रामीण बँकेला १०६ कोटी २१ लाख रुपये, खासगी बँकांना ५३ कोटी ६३ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

ता. २९ फेब्रुवारी अखेर पर्यंत राष्ट्रीयकृत बँकांनी २३ हजार ६०८ शेतकऱ्यांना २५१ कोटी ८१ लाख रुपये (५९.६६ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २७ हजार ५७२ शेतकऱ्यांना १४९ कोटी १२ लाख रुपये (९२.१० टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १ हजार ९९८ शेतकऱ्यांना २१ कोटी ७ लाख रुपये (१९.८४ टक्के), खासगी बँकांनी ५३२ शेतकऱ्यांना १० कोटी ८४ लाख रुपये (१९.८४ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. गतवर्षी (२०२२-२३) ता. २८ फेब्रुवारी अखेर ६९ हजार ७१८ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ९६ लाख रुपये (८५.७८ टक्के) पीककर्ज वाटप झाले होते.

परभणी जिल्हा पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये) ता.२९ फेब्रुवारी अखेर

बँक उद्दिष्ट वाटप रक्कम टक्केवारी शेतकरी संख्या

भारतीय स्टेट बँक २६९.५७ २३०.२३ ८५.४१ २१७१२

महाराष्ट्र ग्रामीण बँक १०६.२१ २१.०७ १९.८४ १९९८

जिल्हा सहकारी बँक १६१.९१ १४९.१२ ९२.१० २७५७२

बँक ऑफ बडोदा ३१.०७ ३.६५ ११.७५ ४२०

बँक ऑफ इंडिया ५.५९ ०.८० १४.३१ ६८

बँक ऑफ महाराष्ट्रा ३९.१४ २.२२ ५.६७ १९२

कॅनरा बँक २२.३४ ३.३७ १५.०९ २५३

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ५.७१ १.०५ १८.३९ १०२

इंडियन बँक ११.३७ ५.१९ ४५.६५ ४६९

इंडियन ओव्हरसीज बँक ४.९० ०.७२ १४.६९ ५६

पंजाब नॅशनल बँक ५.११ ०.४७ ९.२० २४

युको बँक ११.१४ १.९५ १७.५० २०७

युनियन बँक ऑफ इंडिया १६.१४ २.१६ १३.३८ १०५

अॅक्सिस बँक ५.९० ०० ०० ००

एचडीएफसी बँक १८.०१ ४.८४ २६.८७ १०८

आयसीआयसीआय बँक १४.२४ ५.७८ ४०.५९ ३८३

आयडीबीआय बँक १६.४८ ०.२२ १.३३ ४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT