Rabi Crop Loan : रब्बी पीककर्जाचे ३४१ कोटी ६९ रुपये वितरण

Crop Loan Distributed : चालू (२०२३-२४) रब्बी हंगामात ३१ जानेवारी अखेर परभणी जिल्ह्यातील विविध बँकांनी ४३ हजार ४८३ शेतकऱ्यांना ३४१ कोटी ६९ लाख रुपये (४५.८७ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : चालू (२०२३-२४) रब्बी हंगामात ३१ जानेवारी अखेर परभणी जिल्ह्यातील विविध बँकांनी ४३ हजार ४८३ शेतकऱ्यांना ३४१ कोटी ६९ लाख रुपये (४५.८७ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. आजवर ८५.५७ टक्के कर्जवाटप करुन जिल्हा सहकारी बँक आघाडीवर असून त्यानंतर राष्ट्रीयकृत बँका (४३.८६ टक्के),महाराष्ट्र ग्रामीण बँक (१६.४७ टक्के) असा क्रम आहे.मात्र खाजगी बँका (८.६९ टक्के) पिछाडीवर आहेत.

परभणी जिल्ह्यातील १७ बँकांना यंदाच्या रब्बी हंगामात ७४४ कोटी ८३ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यात व्यापारी बँकांना (राष्ट्रयीकृत) एकूण ४४२ कोटी ८ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १६१ कोटी ९१ लाख रुपये,महाराष्ट्र ग्रामीण ग्रामीण बँकेला १०६ कोटी २१ लाख रुपये,खाजगी बँकांना ५३ कोटी ६३ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

Crop Loan
Rabi Crop Loan : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरण ४० टक्क्यांवरच

ता. ३१ जानेवारी अखेर पर्यंत राष्ट्रीयकृत बँकांनी १६ हजार ९५१ शेतकऱ्यांना १८० कोटी ९० लाख रुपये (४२.८६ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २४ हजार ४७४ शेतकऱ्यांना १३८ कोटी ५५ लाख रुपये (८५.५७टक्के),महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १ हजार ७१७ शेतकऱ्यांना १७ कोटी ४९ लाख रुपये (१६.४७ टक्के), खाजगी बँकांनी ३४१ शेतकऱ्यांना ४ कोटी ७५ लाख रुपये पीककर्ज वाटप केले आहे. गतवर्षी (२०२२-२३) ता.३१ जानेवारी अखेर ४० हजार १०१ शेतकऱ्यांना २८८ कोटी ९३ लाख रुपये (४७.६० टक्के) पीककर्ज वाटप झाले होते.

Crop Loan
Crop Loan : पीककर्ज वितरणात पुणे जिल्ह्याचा विक्रम

१८० कोटीवर रुपयाचे नवीन पीककर्ज...यंदा आजवरच्या पीककर्ज वाटपात १५ हजार १८८ शेतकऱ्यांनी १६१ कोटी १४ लाख रुपये एवढ्या पीककर्जाचे नूतनीकरण करुन घेतले तर एकूण २८ हजार २९५ शेतकऱ्यांना १८० कोटी ५५ लाख रुपये एवढे नवीन पीककर्ज वाटप करण्यात आले.

परभणी जिल्हा पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)ता.३१ जानेवारीपर्यंत

बँक उद्दिष्ट वाटप रक्कम टक्केवारी शेतकरी संख्या

भारतीय स्टेट बँक २६९.५७ १५९.९१ ५९.३२ १५१९९

महाराष्ट्र ग्रामीण बँक १०६.२१ १७.४९ १६.४७ १७१७

जिल्हा सहकारी बँक १६१.९१ १३८.५५ ८५.५७ २४४७४

बँक ऑफ बडोदा ३१.०७ ३.३४ १०.७५ ३३४

बँक ऑफ इंडिया ५.५९ ०.५८ १०.३८ ४७

बँक ऑफ महाराष्ट्रा ३९.१४ २.२२ ५.६७ १९२

कॅनरा बँक २२.३४ ३.३७ १५.०९ २५३

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ५.७१ ०.९९ १७.३४ ९४

इंडियन बँक ११.३७ ५.१९ ४५.६५ ४६९

इंडियन ओव्हरसीज बँक ४.९० ०.७२ १४.६९ ५६

पंजाब नॅशनल बँक ५.११ ०.४७ ९.२० २४

युको बँक ११.१४ १.९५ १७.५० २०७

युनियन बँक ऑफ इंडिया १६.१४ २.१६ १३.३८ १०५

अॅक्सिस बँक ५.९० ०० ०० ००

एचडीएफसी बँक १८.०१ ०० ०० ००

आयसीआयसीआय बँक १४.२४ ४.५३ ३१.८१ ३००

आयडीबीआय बँक १६.४८ ०.२२ १.३३ ४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com