Agriculture Crop Loan : शेतमाल तारणद्वारे १ कोटी १७ लाखांवर कर्ज वितरण

Crop Loan Disbursement : शेतकऱ्यांनी तारण ठेवलेल्या एकूण शेतमालाची किंमत १ कोटी ६० लाख १ हजार ४६० रुपये होते, अशी माहिती पणन मंडळाच्या सूत्रांनी दिली.
Agriculture Loan
Agriculture LoanAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत व हिंगोली जवळा बाजार या ४ कृषी उत्पन्न समितीमार्फत यंदा (२०२३-२४ ) बुधवार (ता. ७)पर्यंत ८४ शेतकऱ्यांना ३ हजार ५६५ क्विंटल शेतमालावर १ कोटी १७ लाख ९७ हजार २० रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी तारण ठेवलेल्या एकूण शेतमालाची किंमत १ कोटी ६० लाख १ हजार ४६० रुपये होते, अशी माहिती पणन मंडळाच्या सूत्रांनी दिली.

शेतीमालाचे बाजार भाव कोसळल्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान होते. या परिस्थितीत शेतमाल तारण कर्ज घेऊन तातडीच्या गरजा भागविता येतात. तेजी आल्यानंतर शेतीमालाची विक्री केल्यास फायदा होऊ शकतो. त्यासाठी राज्य पणन महामंडळाअंतर्गत शेतीमाल तारण कर्ज योजना राबविली जात आहे. याअंतर्गत शेतमालाच्या किमतीच्या ७५ टक्के कर्ज ६ टक्के व्याज दराने दिले जाते.

Agriculture Loan
Crop Loan : नांदेड जिल्ह्यास पीककर्जाचे ३०१४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट

परभणी, मानवत या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्वनिधीतून ही योजना राबवीत आहे. सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती पणन मंडळाच्या अर्थसहाय्याने तर जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती स्वनिधी तसेच पणन मंडळाच्या अर्थसहाय्यातून ही योजना राबवीत आहेत. बुधवार (ता. ७) पर्यंत परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत ७७ लाख ८२ हजार ४३५ रुपये किंमतीच्या १ हजार ७२९ क्विंटल सोयाबीन तारणांवर ३६ शेतकऱ्यांना ५८ लाख ३६ हजार ८२० रुपये कर्जवाटप करण्यात आले.

सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ५ शेतकऱ्यांना ८ लाख २३ हजार ७५० रुपये किंमतीच्या १९५.५० क्विंटल सोयाबीनवर ५ लाख ३४ हजार४०० रुपये तारण कर्ज वाटप करण्यात आले. मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे एकूण ३४ शेतकऱ्यांना ४३ लाख २४ हजार तारण कर्ज देण्यात आले.

Agriculture Loan
Loan Statistics : कर्ज म्हणजे वाढावा शोषणारा सक्शन पंप

त्यात ३३ शेतकऱ्यांच्या ५६ लाख ६८ हजार ५१० रुपये किंमतीच्या १ हजार २४८ क्विंटल सोयाबीनवर ४१ लाख ६५ हजार रुपये व १ शेतकऱ्यास दिलेल्या २ लाख ५३ हजार ६०५ रुपये किंमतीच्या ४७.८५ क्विंटल हळदीवर १ लाख ५९ हजार रुपये तारण कर्जाचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार (ता. औंढा नागनाथ) कृषी उत्पन्न बाजार समितीने ९ शेतकऱ्यांना ११ लाख २ हजार रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. त्यात २ शेतकऱ्यांना ७४ हजार रुपये किंमतीच्या ३७ क्विंटल गव्हावर ५५ हजार ५०० रुपये व १ लाख ३९ हजार १६० रुपये किंमतीच्या ३०७.६८ क्विंटल सोयाबीनवर १० लाख ४६ हजार ५०० रुपये कर्ज वाटप केले आहे.

शेतमालतारण कर्जाकडे शेतकऱ्यांचा कल कमी

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १७ पैकी केवळ ४ कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतमाल तारण योजना राबवीत आहेत. यंदा सोयाबीनच्या दरात मोठी घसरण सुरु आहे. परंतु भविष्यात तेजीची चिन्हे दिसत नसल्यामुळे सोयाबीनवर तारण कर्ज घेण्याकडे यंदा शेतकऱ्यांचा कल दिसत नाही. त्यामुळे तूर्त शेतमाल तारण कर्ज योजनेला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com