Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed Case : बियाणे विक्रेत्यांविरुद्ध १८ न्यायालयीन खटले

Cotton Seed Sale Update : परभणी जिल्ह्यात २०२३-२४ आर्थिक वर्षात बियाण्याच्या १८ प्रकरणात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले. अनधिकृत कपाशी बियाणे विक्री प्रकरणी पोलिसात २ गुन्हे दाखल करण्यात आले.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात २०२३-२४ आर्थिक वर्षात बियाण्याच्या १८ प्रकरणात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले. अनधिकृत कपाशी बियाणे विक्री प्रकरणी पोलिसात २ गुन्हे दाखल करण्यात आले.

कृषी निविष्ठा विक्री परवान्यांच्या वेगवेगळ्या अटींचा भंग केल्याचे आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांचे ४, रासायनिक खते विक्रेत्यांचे ६ व कीटकनाशक विक्रेत्यांचे २ मिळून एकूण १२ परवाने निलंबित करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी अंतर्गत गुण नियंत्रण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली.

परभणी जिल्ह्यात बियाणे विक्रीसाठी ७६७, रासायनिक खते विक्रीसाठी ८४४, तर कीटकनाशके विक्रीसाठी ७५९ परवानाधारक आहेत. गुणवत्ता नियंत्रण अंतर्गत यंदा २०२३-२४ मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कार्यालयाने बियाण्याचे ८६० पैकी ६८१ नमुने,

खतांचे ४६३ पैकी १४७ नमुने, कीटकनाशकांचे १४७ पैकी १४२ नमुने संकलित केले. एकूण ७५८ बियाणे विक्रेते, ६६१ खत विक्रेते, ७८२ कीटकनाशक विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. परवान्यातील अटी, शर्तीचा भंग केल्याचे आढळून आल्यामुळे २८ केंद्रावर बियाणे विक्री बंदचे आदेश देण्यात आले. तर २० केंद्रांना खते आणि ७ केंद्रांना कीटकनाशकांच्या विक्री बंदचे आदेश दिले.

मानवत येथे कपाशीच्या एचटबीटी वाणाच्या बियाण्याची विक्री केल्याप्रकरणी व कपाशीचे बनावट बियाणे विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून परवाने निलंबित केले. त्यात ४ बियाणे विक्री परवाने, ६ खते विक्रीचे परवाने, २ कीटकनाशके विक्री परवाने आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा स्तरावर १ व तालुकास्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. कृषी निविष्ठांचा दर्जा, जादा दराने विक्री, साठेबाजी आदी तक्रारीसाठी जिल्हा, तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

परभणी जिल्हा कृषी निविष्ठा विक्री केंद्र स्थिती

तालुका बियाणे रासायनिक खते कीटकनाशके

परभणी १७७ २१२ १७४

जिंतूर १२५ १२८ १२०

सेलू ८१ ९३ ८१

मानवत ५७ ७३ ५७

पाथरी ६२ ६९ ६२

सोनपेठ ३९ ४३ ३९

गंगाखेड ८७ ८० ८७

पालम ४३ ४७ ४३

पूर्णा ९६ ९९ ९६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT