Agriculture Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : बारामती मंडलातील १३८ गावांना लवकरच मिळणार दिवसा वीज

Day Time Electricity For Agriculture : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रकल्प बारामतीमध्ये लवकरच साकार होत आहे. यातून पुणे जिल्ह्यात २२१ मेगावॉट सौर वीजनिर्मिती होणार आहे.

Team Agrowon

Pune News : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रकल्प बारामतीमध्ये लवकरच साकार होत आहे. यातून पुणे जिल्ह्यात २२१ मेगावॉट सौर वीजनिर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील ४१ उपकेंद्रांतर्गत सरकारी गायरान जमिनीवर हा प्रकल्प होणार आहे.

बारामती मंडलातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व शिरूर या पाच तालुक्यांतील जवळपास १३८ गावांमधील ६७ हजार शेतीपंप ग्राहकांना याचा फायदा होणार असून, त्यांना दिवसा वीज मिळणार असल्याची माहिती महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महावितरणच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ युद्धपातळीवर राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ‘एमएसईबी सोलार ॲग्रो पॉवर लि.’ही कंपनी स्थापन केली आहे.

पहिल्या टप्प्यात सरकारी पडीक गायरान जमिनीवर हा प्रकल्प साकारला जात आहे. यासाठी सोलार कंपनीने अकोला, बुलडाणा, वाशीम, नाशिक, नगर, पुणे, जालना, जळगाव व नांदेड या ९ जिल्ह्यांची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यांत २२१ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होईल. त्याकरिता जवळपास १ हजार ९१ एकर जागेची आवश्यकता असून या जमिनी १ रुपया वार्षिक भाडेपोटी ३० वर्षांच्या करारावर शासनाकडून मिळाल्या आहेत.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे ही शासनाची भूमिका असल्याने गायरान जमिनी हस्तांतरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणला मोलाची साथ दिली आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनीही जमीन हस्तांतरणास मदत केली आहे.

४१ पैकी २३ उपकेंद्र बारामतीअंतर्गत, तर उर्वरित पुणे परिमंडलात येतात. १० उपकेंद्रांना त्यांच्या संपूर्ण क्षमते इतक्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये बारामती मंडलात लोणी देवकर व बाभुळगाव उपकेंद्रांतर्गत अनुक्रमे २०.१६ व ९.३८ मेगावॉट वीजनिर्मिती होणार असून त्याकरिता अनुक्रमे १०० व ४५ एकर जमीन करारावर उपलब्ध झाली आहे. तर, उर्वरित २१ उपकेंद्रांना ४४० एकर अशी मिळून तब्ब्ल ५८६ एकर जमीन महावितरणला मिळाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Sales Decline: टरबूज विक्रीवर मुंबईतील घटनेचे सावट

Farm Roads: वर्षानुवर्षे बंद असलेले ‘शिवरस्ते’ झाले मोकळे

Monsoon 2026: यंदा मॉन्सून दगा देणार?; 'एल निनो'मुळे खरीप पीक उत्पादन घटणार, 'आयसीएआर'च्या अभ्यासातून चिंता व्यक्त

Crop Insurance Compensation: पीकविमा भरपाईचे ३३६ कोटी तातडीने वाटप करा : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Farm Pond Lining: शेततळ्याचे अस्तरीकरण कसे करावे; अस्तरीकरणासाठी शासनाकडून अनुदान किती?

SCROLL FOR NEXT