Kolhapur News : कृषी सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी, या हेतूने राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेअंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ७१ उपकेंद्रांच्या ठिकाणी २१४८ एकर जमिनीवर ३४५ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. याद्वारे १ लाख २४ हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा विजेची सोय होणार आहे.
शेतीला दिवसा, अखंडित व शाश्वत वीज देण्यासाठी ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या ठिकाणी ५ ते १० किलोमीटर परिघातील गायरान, नापीक व पडीक जमिनीवर ०.५ ते २५ मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रित सौरप्रकल्प उभारणी होणार आहे. सौर प्रकल्पासाठी शासकीय जमीन नाममात्र १ रुपया दराने भाडेपट्टा व पोटभाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६१ उपकेंद्रे व सांगली जिल्ह्यांतील ९३ उपकेंद्रे योजनेसाठी प्रतीक्षेत आहेत.
कोल्हापूर जिल्हा
४३ उपकेंद्रांच्या ठिकाणी ७९५ एकर जमिनीवर १५९ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारे अंदाजे ६५ हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळणार आहे. जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ३३/११ केव्ही उपकेंद्र - कोगे (सौरप्रकल्प गावाचे नाव -बहिरेश्वर), बालिंगा (आडूर), गगनवाबडा तालुका : गगनबावडा (गगनबावडा), मार्गेवाडी -निवडे (म्हाळुंगे),
पन्हाळा तालुका : पडळ (माजगाव), बाजारभोगाव (पिसात्रे), सातवे (सावर्डे तर्फे सातवे), वेतवडे (हारपवडे), पाटपन्हाळा (पाटपन्हाळा), कळे (परखंदळे) शाहूवाडी तालुका : शाहूवाडी (कोळगाव), सरुड (सरुड), वारुळ (वारुळ), मांजरे (मांजरे),
कागल तालुका : सिद्धनेर्ली (बामणी), सोनगे (बानगे व कुरुकली), केनवडे (केनवडे), भुदरगड तालुका : पिंपळगाव (बामणे), कडगाव (तिरवडे), तांबाळे (अनफ बुद्रुक), शेलोली (शेलोली)
हातकणंगले तालुका: चोकाक (हेर्ले), हातकणंगले (आळते), कुंभोज (नेज), हुपरी (रेंदाळ), किणी वाठार (किणी व वाठार तर्फे वडगाव),
शिरोळ तालुका : कोथळी (कोथळी), अब्दुललाट (लाट), कोंडिग्रे (हरोली), राधानगरी तालुका : सोळांकुर (नरतवडे),
चंदगड तालुका : चंदगड (काजिर्णे व चुर्णीचा वाडा), कोवाड (कोवाड), हालकर्णी (डुक्करवाडी), हालकर्णी एमआयडीसी (जंगमहट्टी), पार्ले (पार्ले), माणगाव (माणगाव), अडकूर (आमरोली व उत्साळी),
गडहिंग्लज तालुका : नेसरी (सांबरे व तावरेडी), महागाव (हारळी बुद्रुक), गडहिंग्लज एमआयडीसी (शेंद्री), हेब्बाळ- क.नूल (हनिमनाळ व हासूर चंपू), आजरा तालुका : उत्तूर (मुमेवाडी व उत्तूर), गवसे (हारपवडे) उपकेंद्रे.
सांगली जिल्हा
२८ उपकेंद्रांच्या ठिकाणी ११५३ एकर जमिनीवर १८६ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारे अंदाजे ५९ हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळणार आहे.
जिल्ह्यातील खानापूर- विटा तालुक्यातील ३३/११ केव्ही उपकेंद्र-खानापूर (सौर प्रकल्प गावाचे नाव - बेनापूर व रेणावी), लेंगरे (रेणावी), गार्डी (भाग्यनगर-भाकुचीवाडी), पारे (रेणावी), रेणावी (रेणावी),
जत तालुका : संख (आसंगी), शेगाव (कोसारी), उमदी (हळ्ळी), तिकोंडी (कोंत्याव बोबलाद व तिकोंडी), पाचापूर (शेड्याळ), धावडवाडी (बेवनूर व बिरनाळ), जिरग्याळ (जिरग्याळ), बसर्गी (बसर्गी), उटगी (बेलोंडगी),
तासगाव तालुका : सावळज (खुजगाव), मणेराजुरी (गवाण), वायफळे (मोरळेपेड), कौलगे (खुजगाव), मांजर्डे (गौरगाव),
आटपाडी तालुका : खरसुंडी (घाणंद), लिंगीवरे (पळसखेड व लिंगीवरे), पुजारवाडी (पळसखेड),
कवठेमहांकाळ तालुका : बोरगाव (मळणगाव), ढालगाव (चुडेखिंडी), करोली (कोगनोळी), केरेवाडी (केरेवाडी), कडेगाव तालुका : वांगी (तडसर), शिरसगाव (शिरसगाव) उपकेंद्रे व गावांचा योजनेत समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.