Agriculture Electricity : जंगलव्याप्त शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करा

Day Time Agriculture : जंगलानजीकच्या शेतीतील पिकांचे रात्री-बेरात्री ओलित करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो
Agriculture Electricity Connection
Agriculture Electricity Connectionagrowon
Published on
Updated on

Wardha News : जंगलानजीकच्या शेतीतील पिकांचे रात्री-बेरात्री ओलित करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात जिवाची जोखीम असल्याने अशा क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरणांतर्गत दिवसा थ्री फेज वीजपुरवठा करावा, अशी मागणी शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे गट) करण्यात आली आहे. वीज वितरण अभियंत्यांना शनिवारी (ता. १६) सादर केलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली.

Agriculture Electricity Connection
Central Electricity Department : सर्वच स्तरातून शेती धोक्यात? पाणी सकंटाबरोबर आता वीज संकट, केंद्राकडून राज्यांना सूचना

निवेदनानुसार, बोरगाव, जामगाव, मानिकवाडा द्रुगवाडा, तारासावंगा, धाडी, वडाळा, वर्धपूर, सत्तरपूर या गावांतील शेतीला रात्रीचा वीजपुरवठा केला जातो. परंतु हा सर्वच भाग जंगलानजीक आहे.

Agriculture Electricity Connection
Agriculture Electricity : कोल्हापूर, सांगलीतील सव्वा लाख कृषी ग्राहकांना दिवसा वीज मिळणार

वन्यप्राण्यांचा वावर या भागात असल्याने त्यांच्याकडून यापूर्वी जनावरांच्या शिकारीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा या भागात मुक्‍त संचार असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली.

शिवसेनेच्या वतीने आष्टी तहसीलदार, वीज वितरणचे अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा प्रमुख आशिष पांडे, उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव, तालुका प्रमुख चंद्रशेखर नेहारे, शरद वरकड, सुरेश टरके, विजय गावंडे, हरीश लाड, प्रफुल्ल मुंदाने, प्रवीण मोहिते, श्‍याम शिरके, मनोहर दंडाळे, सुभाष काकणे, साहेब उंबरकर, देवेंद्र उगले, विनायक हेडाऊ, सुरेश खवशी, अवि चोखटकर, प्रशांत कडू उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com