SSC Result 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

SSC Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के

Tenth Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १ ते २६ मार्च २०२४ दरम्यान घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सोमवारी (ता. २७) जाहीर केला.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १ ते २६ मार्च २०२४ दरम्यान घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सोमवारी (ता. २७) जाहीर केला. यंदा ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नऊ विभागीय मंडळांतून घेण्यात आलेल्या निकालामध्ये कोकण मंडळाचा सर्वाधिक ९९.०१ तर सर्वात कमी नागपूर मंडळाचा ९४.७३ टक्के निकाल लागला आहे. तर नियमित मुलींचा निकाल ९७.२१ टक्के असून मुलांचा निकाल ९४.५६ टक्के आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा २.६५ टक्क्यांनी जास्त आहे.

शिक्षण मंडळाच्या वतीने (१० वी बोर्ड) पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून एकूण १५ लाख ६० हजार १५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थी या परीक्षेकरता प्रविष्ट झाले होते. यातील १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाच्या निकालाची टक्केवारी ९५.८१ एवढी आहे. मागील वर्षी १० वी बोर्डाचा ९३.२३ टक्के निकाल लागला होता. म्हणजेच, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा टक्केवारीत १.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

निकालाची विभागनिहाय टक्केवारी
कोकण : ९९.०१ टक्के
कोल्हापूर : ९७.४५ टक्के
पुणे : ९६.४४ टक्के
मुंबई : ९५.८३ टक्के
अमरावती : ९५.५८ टक्के
नाशिक : ९५.२८ टक्के
लातूर : ९५.२७ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९५.१९ टक्के
नागपूर : ९४.७३ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wildlife Management: हल्ले रोखण्यासाठी बिबट्यांना कोंबडे, बकरे खाऊ घालणार: वनमंत्री गणेश नाईक

Sanjeevan Samadhi Sohla: भावपूर्ण वातावरणात माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता

Gopal Ratna Award: राष्ट्रीय ‘गोपाळ रत्न’ पुरस्कारात महाराष्ट्र अव्वल

Sugar Industry: राज्यात सर्वाधिक १७० कारखाने सुरू

Banana Rate: केळी उत्पादक शेतकरी हतबल; केळीला २ रुपये ते ७ रुपये दर

SCROLL FOR NEXT