Pune News: पुणे विभागातील अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत रब्बी हंगामातील पिकांची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. एकूण सरासरी १० लाख ८० हजार ४६१ हेक्टर क्षेत्रापैकी १० लाख ६६ हजार ६८ हेक्टरवर म्हणजेच सुमारे ९९ टक्के पेरा झाला आहे. काही तालुक्यांत उशिरा झालेला पाऊस, खरीप पिकांच्या काढणीस झालेला विलंब तसेच ऊसतोड लांबल्यामुळे पेरणीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे..अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगामातील तूर पीक सध्या शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पीक फुलोरा ते हुरडा अवस्थेत असून गहू पीक कांडी धरणे, ओबीच्या आणि वाढीच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक फांद्या फुटणे ते फुलोरा अवस्थेत असून करडई पीक वाढीच्या व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. सूर्यफूल पीकही वाढीच्या अवस्थेत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली..Rabi Sowing: रब्बी पीक पेरा ९२ टक्क्यांवर.पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी पीक वाढीच्या तसेच फुलोरा अवस्थेत आहे. गहू पीक फुटवे फुटण्याच्या आणि ओंबी अवस्थेत पोहोचले आहे. मका पीक वाढीच्या ते फुलोरा अवस्थेत असून, हरभरा पीक फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. एकूणच पिकांची वाढ समाधानकारक असल्याचे चित्र आहे..Rabi Sowing: नाशिक जिल्ह्यात रब्बीचा सरासरीपेक्षा अधिक पेरा.सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामातील तूर पिकाची काढणी सुरू झाली असून, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पीक पोंगा ते कणीस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत असून मका पीक वाढीच्या ते फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा ते घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. एकूणच पुणे विभागात रब्बी हंगामातील पिकांची स्थिती समाधानकारक आहे..जिल्हानिहाय रब्बी पेरणी (हेक्टरमध्ये)जिल्हा सरासरी क्षेत्र पेरलेले क्षेत्र टक्केवारीअहिल्यानगर ४,४९,६६७ ४,१७,८७४ ९३पुणे १,८७,६९५ १,८१,७५० ९७सोलापूर ४,४३,०९९ ४,६६,४४५ १०५पुणे विभाग १०,८०,४६१ १०,६६,०६८ ९९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.