10th Result : दहावीचा निकाल लागला! कोकण विभागाची बाजी, राज्याचा निकाल ९५.८१ टक्के

SSC Board Exam : राज्यातील दहावीचा निकाल सोमवारी (ता. २६) रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. यात कोकण विभागाने बाजी मारली असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.
SSC Result
SSC ResultAgrowon

Pune News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षेचा निकाल सोमवारी (ता.२६) घोषित करण्यात आला. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत आजचा निकाल जाहीर केला. राज्याचा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला असून ९९ टक्क्यांनी कोकण विभागाचा सर्वोत्तम निकाल आहे. यामुळे यंदा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये देखील कोकण विभागाने बाजी मारली असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९४ टक्के लागल्याची माहिती गोसावी यांनी दिली. तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निकाल वेबसाईटवर दुपारी १ वाजता पाहता येणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची १६ लाख ९ हजार ५४४ विद्यार्थ्यी वाट पाहत होते. निकालाबाबत त्यांच्यासह पालकांच्या मनात हूरहूर लागली असतानाच सोमवारी ही निकाल जाहीर झाला. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९७.२१ टक्के आहे. मुलांची टक्केवारी ९४.५६ टक्के आहे. तसेच ७२ पैकी १८ विषयांचा निकाल हा १०० टक्के लागल्याचे मंडळाचे अध्यक्ष गोसावी यांनी सांगितले.

SSC Result
SSC Result 2024 : अखेर प्रतिक्षा संपली! १० वीचा निकाल २७ मे रोजी

दहावीच्या निकालाबद्दल पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती गोसावी यांनी दिली. यावेळी राज्याचा निकाल १०० टक्के लागला असून यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष मोहिम घेतल्याचे ते म्हणाले. तसेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हानिहाय भरारी पथकांच्या संख्येत वाढ करत सुरक्षा वाढवण्यात आली होती. यामुळे यंदा परिक्षा योग्य स्थितीत पार पडली असेही गोसावी म्हणाले.

SSC Result
Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल जाहीर, निकालात यंदाही मुलीच वरचढ ; राज्याचा एकूण निकाल ९३.८३ टक्के

तसेच यंदा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये १६ लाख २१ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यातील १६ लाख १७ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. तसेच ९१४९ दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ९०८७ विद्यार्थी पास झाले असून दिव्यांगांची टक्केवारी ९३.२५ टक्के आहे. तर १८७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळवले असल्याचेही गोसावी म्हणाले.

राज्यात ३८ शाळांचा शुन्य टक्के निकाल

गोसावी यांनी दिलेल्या माहितीवरून राज्याचा निकाल १०० टक्के लागला असला तरिही ३८ शाळांचा निकाल शुन्य टक्के आहे. तर ९३८२ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. शुन्य टक्के निकालामध्ये पुण्यातील ६, नागपूरमधील ५, छत्रपती संभाजीनगरच्या ५, मुंबईमधील ५, कोल्हापूरची १ शाळा, अमरावतीच्या ७ शाळा, नाशिक विभागातील ३ आणि लातूरमधील ६ शाळांचा समावेश आहे.

निकाल कुठं पाहणार?

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

https://results.targetpublications.org

निकाल कसा पाहणार?

बोर्डानं दिलेल्या वेबसाईटला म्हणजेच https://mahresult.nic.in ला भेट द्या

दहावी परीक्षा निकाल पर्यायावर क्लिक करून तुमचा परीक्षा क्रमांक टाका

यानंतर तुमच्या आईचं नाव आणि इतर आवश्यक माहिती भरून इंटर करा. निकाल तुमच्या स्क्रिनवर असेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com