हवा, पाणी असो की माती, त्यांच्या वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला की वादविवाद होतात, त्याबाबत अधिक अभ्यास करून उपाययोजनांचे गाजर दाखविले जाते, प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही..औद्योगिक वसाहतीतील रसायन मिश्रित सांडपाणी आणि शहरांतील मैलापाणी यामुळे उजनी धरणातील पाणी मृतावस्थेच्या दिशेने जात असल्याची धक्कादायक माहिती ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएनएचएस) शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार ३०० पेक्षा जास्त ‘टीडीएस’ (टोटल डिझॉल्व्हड सॉलिड्स) असलेले पाणी असुरक्षित मानते जाते..Ujani Dam Pollution : उजनी प्रदूषणाबाबत केंद्र सकारात्मक, राज्य शासन उदासीन.उजनीतील पाण्यातील ‘टीडीएस’चे प्रमाण ७०० वर पोहोचले असल्याने हे पाणी किती घातक झाले आहे, हे लक्षात यायला हवे. उजनीतील पाणी जलचरांबरोबर मानवास पिण्यासाठी तसेच शेतीसाठी देखील सुरक्षित नाही.उजनी धरण पुण्यातील नदी प्रणालीशी जोडलेले असल्याने या शहरासह परिसरातील उद्योगही उजनीच्या प्रदूषणास तेवढेच जबाबदार आहेत. सुमारे सहा महिन्यांपूर्वी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी उजनीतील पाणी मानवालाच नव्हे तर प्राण्यांना सुद्धा पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट केले होते..त्या वेळी उजनी धरणातील पाणी प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली येथील विज्ञान आणि पर्यावरण केंद्राचे संशोधक दूषित पाण्याचा अभ्यास करणार होते, त्याचे पुढे काय झाले हे कळत नाही. राज्यातील इतरही धरणे, नद्यांच्या वाढत्या प्रदूषणाबाबत अनेकांनी निरीक्षणे नोंदविली आहेत. पंचगंगा, वारणेचे प्रदूषणही उद्योगाच्या रसायनमिश्रित पाण्याने झाले आहे. या दोन्ही नद्यांमध्ये वर्षभरापूर्वी लाखो जलचरांचा मृत्यू झाला होता. रसायन तसेच जडधातूयुक्त पाण्याने नदीखोरे, धरण क्षेत्रातील शेती खराब होते. असे पाणी प्यायल्याने अनेक गंभीर आजारांचा सामना जनतेला करावा लागतो..Ujani Dam Pollution : उजनी प्रदूषणाबाबत केंद्र सकारात्मक, राज्य शासन उदासीन.देशपातळीवर देखील नदी, नाले, धरणांची परिस्थिती यापेक्षा भिन्न नाही. वर्षभरापूर्वी प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याच्या वेळी तेथील गंगेचे पाणी स्नानासाठी अयोग्य असल्याचे मत ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने (सीपीसीबी) तपासणीअंती मांडले होते. हवा, पाणी असो की माती, त्यांच्या वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला, की वादविवाद होतात, त्याबाबत अधिक अभ्यास करून उपाययोजनांचे गाजर दाखविले जाते, प्रत्यक्षात होत काहीच नाही, हा मागील अनेक वर्षांपासूनचा अनुभव आहे..राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार गंभीर असून, सांडपाणी प्रक्रिया न करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच नवीन कृती दलाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सुमारे वर्षभरापूर्वी केली होती. उजनीसह इतर धरणे, नद्यांचे प्रदूषण वाढत असताना कोणत्या उद्योगावर कारवाई झाली तसेच हे कृती दल नेमक्या काय उपाययोजना करीत आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे..पाण्याची चणचण असलेल्या राज्यात प्रदूषित नद्या, धरणे म्हणजे सार्वजनिक हलगर्जीपणा आणि शासन पातळीवरील दुर्लक्षाचा कळस म्हणावा लागेल. सर्व उद्योगांना प्रदूषण नियंत्रण यंत्रणा राबविणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही नद्या, धरणे प्रदूषित होतात कारण उद्योजक प्रदूषण नियंत्रण यंत्रणा राबवीत नाहीत. प्रदूषण नियंत्रण मंडळ पण त्याकडे दुर्लक्ष करते. शहरातील मैलापाणी असो की औद्योगिक सांडपाणी, हे प्रक्रिया करूनच नद्या, धरणांत सोडण्यात यायला हवे. नदी, धरणे परिसरातील लोकांना प्रदूषणाचा मोठा.फटका बसत असल्याने त्यावर नियंत्रणासाठीचा लढा हाती घ्यायला हवा. हे करीत असताना पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी घरगुती रसायनांचा वापर कमी करून, काही पाण्याचा पुनर्वापरही करायला हवा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.