Shivaji University Kolhapur : शिवाजी विद्यापिठात शेती, पर्यावरणपूरक विषयी विद्यार्थ्यांनी मांडल्या नवसंकल्पना
Shivaji University Kolhapur : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापिठात अविष्कार संशोधन महोत्सव ठेवण्यात आला आहे. यामध्ये शेती पर्यावरणपूरक वस्तू यांचा समावेश करण्यात आलाय. या महोत्वात ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध प्रयोग सादर केले आहेत. मातीविना शेती, पर्यावरणपूरक कचराकुंडी (स्मार्ट नेचर फ्रेंडली डस्टबिन), सलाईन पातळी नियंत्रण करणारी वायरलेस यंत्रणा, आदी संशोधनातील नवसंकल्पनांचे विद्यार्थ्यांनी मांडल्या होत्या.
शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात भूगोल अधिविभागाने आयोजित केलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. मेधा गुळवणी, एस. एस. महाजन, डी. एच. दगडे, पो. टी. गायकवाड, मीना पोतदार आदी उपस्थित होते.
या प्रमुख उपस्थितांनी महोत्सवातील प्रकल्प, भित्तीपत्रकांची पाहणी करून स्पर्धेकांसमवेत संवाद साधला. या महोत्सवात शेती व पशुसंवर्धन, आभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र व औषध निर्माणशास्त्र, मानव्यशास्त्र, वाणिज्य या गटात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधक विद्यार्थी सहभागी झाले.
त्यातील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीच्या सुदीप कुलकणी, तैफूर पटवेगार यांनी हॉस्पिटलमधील रूग्णांना लावण्यात येणाऱ्या सलाईनची पातळी नियंत्रण करणारी वायरलेस यंत्रणेचे सादरीकरण केले. न्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सेन्सरवर आधारित असलेली पर्यावरणपूरक स्वयंचलित कचराकुंडीचे संशोधन मांडले.
साताऱ्यातील एलबीएस कॉलेजच्या अपर्णा मोरे, श्रवणी भानसे यांनी मातीविना शेतीचे, तर डॉ. घाळी कॉलेजच्या ऋषी दळवी पाने केळीच्या मोण्यांपासून नर्सरीतील रोपे तयार करण्यासाठी लागणाऱ्या पर्यावरणपूरक कुंडीचे सादरीकरण केले.
आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेज पलूसच्या अथर्व मोरे याने प्लॅस्टिकपासून थर्मल वीजनिर्मितीचा प्रकल्प सादर केला. अधिकतर स्पर्धक विद्यार्थ्यांनी संशोधनापर भित्तीपत्रकांचे सादरीकरण केले. त्यात तणाव - व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, - ऑनलाईन परीक्षेचा विद्यार्थ्यांवरील परिणाम, आदी विषयांचा समावेश होता.
दरम्यान, यावर्षी आविष्कार संशोधन महोत्सव पहिल्या टप्प्यात महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात आला. त्याचा चांगला परिणाम म्हणजे विद्यापीठस्तरीय महोत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धेक विद्यार्थ्यांची संख्या सुमारे शंभरने वाढली आहे. समाजोपयोगी आणि नव्या विषयांवरील संशोधन आणि कल्पनांची माहिती या महोत्सवात मिळाली. त्याने निश्चितपणे ज्ञानात भर पडली. - लक्ष्मी कोळी, कोल्हापूर
'या महोत्सवात मी पहिल्यांदाच सहभागी झालो. दातांच्या कवळी स्वच्छतेबाबतचे संशोधन मांडले. खूप चांगला अनुभव मिळाला. नव्या संशोधनाची माहिती मिळाली. - ऋतुराज जाधव, अंबप
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.