Milk Adulteration Test Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Adulteration Testing : दूध भेसळ तपासणीसाठी हजार नमुने

Adulteration Testing Campaign : राज्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्या असून, अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी (ता. १५) एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबवून एक हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने घेतले.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्या असून, अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी (ता. १५) एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबवून एक हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने घेतले. यात दोषी आढणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

दूध आणि दुग्धजन्य अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर जरब बसण्याकरिता व भेसळ रोखण्याकरिता तसेच राज्यातील जनतेस उपलब्ध होणाऱ्या दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने राज्यात व्यापक दूध भेसळ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत एकाचवेळी राज्यभरातील विविध ठिकाणांहून दुधाचे सर्वेक्षण नमुने घेऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी १०३ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. सकाळी पाच वाजेपासून राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दूध उत्पादक, वितरक, विक्रेते व रस्त्यावरील विक्री केंद्रांवरून १ हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्‍लेषणासाठी घेतले.

त्यापैकी राज्यात विक्री होणाऱ्या विविध ब्रॅण्डच्या दुधाचे ६८० पिशव्या आणि ३८२ सुट्या स्वरूपातील दुधाचे नमुने घेतले. ताब्यात घेण्यात आलेले नमुने अन्न सुरक्षा व मानके प्राधिकृत अन्न प्रयोगशाळेत पाठवून भेसळ, रसायनांचे प्रमाण व दुधाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे.

या सर्वेक्षण नमुने विश्लेषणांतील दुधाच्या नमुन्यामध्ये भेसळ आढळल्यास तत्काळ या आस्थापनेमधून कायदेशीर नमुने घेऊन संबंधित उत्पादक व पुरवठादार यांच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

...येथे करा तक्रार

दूध किंवा अन्नपदार्थांमध्ये भेसळ दिसल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाइन क्रमांक १८००२२२३६५ वर त्वरित संपर्क साधावा किंवा jc-foodhq@gov.in या ई-मेल वर किंवा https://foscos.fssai.gov.in/consumergrievance या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT