Nagpur News: मसाला उद्योगात वाढत्या स्पर्धेत गुणवत्ता, सातत्य आणि परंपरा जोपासत वाघ कुटुंबाने पारंपरिक मसाल्यांना देविका गृह उद्योगाच्या नावाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. घरगुती पातळीवर सुरू असलेल्या या गृहउद्योगाला कृषी विभागाचे सहकार्य मिळाल्याने तीन कुटुंबांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. .शहरातील गणेश पेठ पोलिस ठाणे परिसरातील उद्योजक विक्रम वाघ यांनी या गृह उद्योगाविषयी माहिती देताना सांगितले, की वडील सेवानिवृत्त झाले. त्याच वर्षी बहिणीचे लग्न झाले. या दरम्यानच्या काळात आईने कुटुंबाला हातभार म्हणून पारंपरिक अस्सल खडे मसाले तयार करून विक्रीची संकल्पना मांडत प्रत्यक्षात अमलात आणली..Spice Farming: मसाला पीक क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करावेत.तयार मसाल्याचा प्रायोगिक तत्त्वावर केटरिंगवाल्यांना पुरवठा करण्यात आला. मसाल्याची गुणवत्ता चांगली असल्याने मागणी वाढू लागली. माझे लग्न झाल्यानंतर पत्नी रेणुका यांनीदेखील याच व्यवसायात पुढे सातत्य ठेवले आणि विस्तारही केला..अर्धा किलो, एक किलो मसाल्यापासून सुरू झालेला हा गृहउद्योग आज ७० किलो विक्री प्रति दिवसापर्यंत पोहोचला आहे. याला सहा महिन्यांपूर्वी कृषी विभागाच्या योजनेचा बूस्ट मिळाला आणि गृहउद्योगाने गती पकडली. आज या व्यवसायातून तीन कुटुंबांना रोजगार मिळतो आहे. मर्यादित साधनसामग्री असूनही शुद्धता आणि पारंपरिक चवीवर भर देत त्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकला. या विश्वासावर उभी राहिलेली मजबूत पायाभरणी पुढील पिढीला मार्गदर्शक ठरली, असेही त्यांनी सांगितले..Spice Business: ‘रानातलं किचन’ समृद्धीचं कारण.पातोडी स्पेशल मसाल्याला मागणीप्रत्येक मराठी घरात पातोडी आवडीने बनविली जाते. मात्र परंपरागत आवश्यक खड्या मसाल्याचे प्रमाण हल्ली गडबडले आहे. १८ प्रकारच्या खड्या मसाल्याचे प्रमाणात मिश्रण तयार करून रेडी टू ईट पातोडी स्पेशल आणि मांसाहार करणाऱ्यांसाठी नॉनवेज स्पेशल अशा दोन प्रकारांत मसाला तयार केला जातो. यात पातोडीला सर्वाधिक मागणी असल्याचे या वेळी रेणुका वाघ यांनी सांगितले..मसाल्याच्या दर्जात तडजोड नाहीखडे मसाले महाग आहेत. तसेच या व्यवसायात मेहनतही अधिक आहे. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या मसाल्यांत आपली जागा निर्माण करण्यासाठी दर्जात कुठेही तडजोड केली जात नाही. ५० ग्रॅमपासून ५० किलोपर्यंत मागणीनुसार पुरवठा केला जातो. प्रामुख्याने सर्व ग्राहक आचारी, लहान-मोठे हॉटेल व्यावसायिक आहेत..देविका गृह उद्योगाचे हे मसाले शहरातील सदर, मानेवाडा, बेसा, गोधनी, मोहन नगर, धरमपेठ आदी भागांत घरगुती नागरिकांना मागणीनुसार विक्री केली जाते. एकदा जुळलेला ग्राहक आतापर्यंत तरी तुटला नाही.रेणुका विक्रम वाघ, संचालक, देविका गृह उद्योग, नागपूर ९९२२५८६१४३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.