Food Adulteration : अन्न भेसळ ओळखण्याच्या पद्धती

Healthy Diet : मानवी जीवनात आहार ही मूलभूत  गरज आहे. अन्न हे केवळ पोट भरण्याचे माध्यम नाही तर आरोग्यासाठी शुद्ध सात्त्विक आहार प्रत्येकाला मिळणे गरजेचे आहे.
Adulteration
AdulterationAgrowon
Published on
Updated on

अमृता दंडवते, डॉ. भरत आगरकर

मानवी जीवनात आहार ही मूलभूत  गरज आहे. अन्न हे केवळ पोट भरण्याचे माध्यम नाही तर आरोग्यासाठी शुद्ध सात्त्विक आहार प्रत्येकाला मिळणे गरजेचे आहे. परंतु काही जण आर्थिक नफ्यासाठी अन्नामध्ये हेतुपूर्वक शरीराला हानिकारक घटक मिसळतात. त्याचा अतिशय घातक परिणाम शरीरावर होतो. वर्षानुवर्षे भेसळयुक्त अन्नपदार्थ खाण्यात आल्यामुळे आरोग्याची हानी होते.

रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन आजारांचे प्रमाण वाढते. हे टाळण्यासाठी अन्नातील भेसळ ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. दुधात पाण्याची भेसळ, तेल काढून तेलबिया विकणे, फळांना ग्लुकोजचे इंजेक्शन देऊन विकणे, अशी अनेक भेसळीची उदाहरणे आपल्याला वरचेवर पाहायला मिळतात. या भेसळीचे दुष्परिणाम ग्राहकांवर होतात. पोट बिघडणे, उलट्या, अॅनिमिया, मूत्रपिंडाचे आजार, कर्करोग असे अनेक आजार भेसळीमुळे होतात.

अन्नपदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ मध्ये मंजूर करण्यात आला. भेसळयुक्त अन्न लोकांच्या आहारात येऊ नये हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. घरगुती स्तरावर काही तपासण्या करून अन्न भेसळ शोधता येते.

Adulteration
Food Adulteration : वेळीच ओळखा अन्नातील भेसळ

दुधात भेसळ

दुधात प्रामुख्याने पाणी, मक्याचे पीठ, साखरेचे पीठ, निरमा पावडर अशा पदार्थांची भेसळ केली जाते.दुधात पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी एक ताटामध्ये एक दुधाचा थेंब टाका. जर दूध शुद्ध असेल तर थेंब हळूहळू खाली जाईल आणि वाहताना त्याचा रंग पांढरा होईल. पण जर दुधात भेसळ असेल तर ते वेगाने खाली वाहून जाते आणि नंतर ताटात दुधाचा रंग राहत नाही.

Adulteration
Food Adulteration ...अशी ओळखा अन्नपदार्थांतील भेसळ

शुद्ध आणि भेसळयुक्त तुपातील फरक 

एका भांड्यामध्ये एक चमचा तूप गरम करण्यासाठी ठेवा. जर तूप लगेचच वितळले आणि त्यास गडद तपकिरी रंग आला तर हे तूप शुद्ध आहे.

तूप वितळण्यास वेळ लागत असल्यास आणि त्यास हलका पिवळा रंग आल्यास तूप भेसळयुक्त आहे, हे लक्षात घ्यावे.

एक चमचा तुपामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा आयोडीन मिसळावे. रंग बदलला तर तुपात भेसळ असण्याची शक्यता आहे.

मधातील भेसळ

एका काचेच्या ग्लासात पाण्यात एक चमचा मध टाकावे. जर मध पाण्यात विरघळले असेल तर ते बनावट आहे.

शुद्ध मध काचेच्या तळाशी धाग्याचा आकार घेईल, जाड होईल आणि तेथेच राहील.

डाळीमध्ये रंगाची भेसळ

एक चमचा डाळीमध्ये एक चमचा पाणी आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडचे काही थेंब टाकावेत. त्यात रंग मिसळला असल्यास तो बाहेर येईल.

हळदीमध्ये भेसळ

हळदीमध्ये पाण्याचे पाच थेंब आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडचे पाच थेंब मिसळावेत. पावडर भेसळयुक्त असेल तर त्याचा रंग जांभळा किंवा गुलाबी होईल.

साखरेतील भेसळ

एक कप पाण्यात दोन चमचे साखर

गरम करावी. त्यात खडू पावडर असेल तर ती खाली दिसायला लागेल.

खाद्य तेलातील भेसळ

पारदर्शक ग्लासमध्ये खोबरेल तेल भरून फ्रीझमध्ये ठेवावे. शुद्ध तेल भेसळयुक्त तेलापेक्षा वेगाने गोठते.

थोड्या खाद्यतेलात नायट्रिक ॲसिडचे थेंब टाकून ढवळून घ्यावे. जर तेल फिकट तपकिरी रंगाचे असेल तर त्यामध्ये भेसळ आहे हे समजावे.

खाद्यपदार्थ भेसळ होणारे घटक

पनीर, खवा, दूध खळ

खाद्य तेल आर्गीमोनी तेल

चहा वापरलेल्या चहाची पूड, पाने, लाकडाचा भुसा

जिरे, खसखस अनैसर्गिक रंग लावलेल्या बिया

हळद लेड क्रोमेट

तूरडाळ केसरी डाळ

अन्नधान्य खडे, संगमरवर दगडाचे तुकडे, वाळू

तिखट रंगवलेला लाकडाचा भुसा

मोहरी धोतऱ्याच्या बिया

मध ग्लुकोज, गुळाचा पाक

- डॉ. भरत आगरकर, ८१९६०३६११४, (अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com