Sea Moss Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sea Moss Farming : समुद्री शेवाळ शेतीतून शंभर महिला स्वावलंबी

राजेश कळंबटे

Ratnagiri News : समुद्री शेवाळाच्या शेतीमधून रत्नागिरी तालुक्यातील काजिरभाटी, वरवडे आणि जयगड-पाटीलवाडी या तीन गावांतील शंभर महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे. गतवर्षी या शेतीमधून पावणेसात टन शेवाळ उत्पादित केली. त्या माध्यमातून सुमारे पन्नास हजार रुपये उत्पन्न महिलांना मिळाले.

महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभाग आणि ‘क्लायमा क्रू प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या सहकार्याने २०२२ मध्ये रत्नागिरी तालुक्यात समुद्री शेवाळ शेतीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. याला महिला आर्थिक विकास महामंडळ आणि कम्युनिटी सेंटरने मदत केली. क्लायमा कंपनीने इंडियन सेंटर फॉर क्लायमेट अ‍ॅण्ड सोसायटल इम्पॅक्ट रिसर्चच्या मदतीने महिला शेतकऱ्यांना समुद्री शेवाळ लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले.

तिन्ही गावांमध्ये ‘कॅपाफायकस अल्वारेझी’ या प्रजातीच्या समुद्र शेवाळाची लागवड केली आहे. रत्नागिरीचे सागरी वातावरण या प्रजातीच्या वाढीसाठी पोषक आहे. तसेच तिची वाढ ४५ दिवसांत जलद गतीने होत असल्याने शेतीकरिता या प्रजातीची निवड करण्यात आली. लागवडीच्या पद्धतीत प्रामुख्याने बांबू तराफा पद्धतीचा अवलंब करण्यात येतो.

एका तराफ्याला समुद्र शेवाळ बांधल्यानंतर साधारण ४५ दिवसांनंतर त्यामधून उत्पादन मिळते. तिन्ही गावांमध्ये केलेल्या शेतीमधून एका तराफ्याला ४० किलो उत्पादन मिळाले. १६९ तराफ्यांतून ६ हजार ७६० किलो शेवाळ मिळाले. त्याची आठ रुपये किलोने विक्री झाली. ही शेवाळ क्लायमा कंपनीने विकत घेतली.

समुद्री शेवाळाचा उपयोग

समुद्री शेवाळ हे ‘मॅक्रो ॲलग्गे’ या गटात मोडते. ‘समुद्री शेवाळ’ ही नवनिर्माण करण्यायोग्य सेंद्रिय सामग्री आहे. त्याचा वापर जैवइंधन, बायोप्लॅस्टिक, सौंदर्य प्रसाधने, मानवी अन्न, खतनिर्मिती आणि औषधनिर्मितीत होतो. रत्नागिरीत उत्पादित होणाऱ्या ‘कॅपाफायकस अल्वारेझी’ या समुद्री शेवाळापासून प्रामुख्याने सेंद्रिय खत, औषधनिर्मिती, बायोप्लॅस्टिक तयार केले जाते.

समुद्री शेवाळ शेतीमधून महिलांना रोजगाराचे साधन मिळाले आहे. पुढील टप्प्यात सुमारे ४०० राफ्ट किनाऱ्यावर टाकण्यात आले आहेत. त्यामधून सुमारे २५ टन शेवाळ मिळेल अशी अपेक्षा आहे. भविष्यात यामधून महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळू शकतो.
- अंबरीश मेस्त्री, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT